loader
Breaking News
Breaking News
Foto

भरतशेठ गोगावले यांच्याशी राजकीय मतभेद आता संपले; आमच्यात मतभिन्नता शिल्लक नाही!आमदार शेखर निकम यांच्या मंत्रिपदाबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे महत्त्वपूर्ण विधान

चिपळूण (ओंकार रेळेकर) : भरतशेठ गोगावले आणि माझ्यात यापूर्वी राजकीय मतभेद जरूर होते. मात्र, आज आम्ही एनडीए आणि राज्यातील महायुतीमध्ये एकत्र आहोत. त्यामुळे आमच्यातील राजकीय मतभिन्नता आता त्या अर्थाने शिल्लक राहिलेली नाही, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केले. दीपावलीच्या पूर्वसंध्येला संपर्क कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय, सामाजिक आणि विकासकामांच्या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्या मंत्रिपदाच्या संधीबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण विधान केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नुकतीच घेतलेली भेट आणि त्यानंतर सुरू झालेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या चर्चेबाबत विचारले असता तटकरे म्हणाले की, गेली सहा दशके देशाच्या सार्वजनिक जीवनात मोठे योगदान देणाऱ्या पवार साहेबांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना नियमित तपासणीसाठी बीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशा वेळी प्रफुल्ल पटेल, मी किंवा पवार साहेबांचे आशीर्वाद लाभलेले अन्य सहकारी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेणारच. या भेटीचा राजकीय अर्थ काढणे योग्य नाही. पवार साहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजकारण, राजकारण आणि कृषी क्षेत्रासाठी समर्पित केले आहे. त्यामुळे या भेटीतून भविष्यात काही वेगळे राजकीय समीकरण घडेल, असे मला वाटत नाही.आपल्या राजकीय विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर बोलताना तटकरे म्हणाले की, मी माझ्या सार्वजनिक जीवनात नेहमी शांतपणे राजकारण करीत आलो आहे. रायगडच्या जनतेने गेली चाळीस वर्षे मला सांभाळले आणि प्रेम दिले आहे. माझ्यावर टीका करणाऱ्यांच्या संस्कृतीचा तो भाग आहे. त्यांनी त्यांच्या भाषेत टीका करावी. मात्र, त्यांच्या टीकेमुळे जनतेचे माझ्यावरील प्रेम अधिक वाढते. अजय बिरवटकर यांच्याकडून झालेला पराभव काही जण विसरू शकत नाहीत. त्यामुळे निराशेतून आणि नैराश्यातून अशा असंस्कृत भाषेत वक्तव्ये केली जात असल्याचेही त्यांनी सूचित केले.

टाइम्स स्पेशल

रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी गणेशोत्सवाच्या काळात सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले होते. या भेटीनंतर रायगडमधील शिंदे गटातील राजकीय घडामोडींना वेग आला होता. याबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, महाराष्ट्रात एकमेकांच्या घरी जाण्याची आणि सणासुदीला सदिच्छा भेटी देण्याची परंपरा आहे. भरतशेठ गोगावले माझ्याकडे गणपतीच्या दर्शनासाठी आले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानले. मी स्वतः पंधरा वर्षे रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. त्यामुळे काही काळ राजकीय मतभेद आणि गैरसमज असू शकतात. मात्र, आज आम्ही महायुतीत एकत्र आहोत. त्यामुळे आता आमच्यात ती राजकीय मतभिन्नता राहिलेली नाही. शिंदे गटातील अंतर्गत कलह हा त्यांचा प्रश्न असून त्यावर मी भाष्य करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावर तटकरे म्हणाले की, सध्या राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही प्रश्न समोर नाही. मात्र, शेखर निकम यांना राजकीयदृष्ट्या ताकद देण्याची वेळ यापूर्वीही आली होती आणि भविष्यातही जेव्हा अशी वेळ येईल, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहील. त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी या विधानातून स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg