कुणकेरी, : कुणकेरी मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून काही ठिकाणी पाणी साचून रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कुणकेरी ग्रामपंचायतीमार्फत सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांच्याकडे तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. कुणकेरीच्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण होऊन काही कालावधी लोटला असला तरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच काही ठिकाणी पाणी साचून रस्त्याचे नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत ग्रामपंचायतीमार्फत यापूर्वीही संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, कंत्राटदार परांजपे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते फोन उचलत नाहीत. तसेच प्रत्यक्ष भेट झाल्यास समस्येबाबत समाधानकारक प्रतिसाद न देता उडवाउडवीची भाषा केली जाते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संबंधित कामाची पाहणी करून दोष दूर करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी कुणकेरीच्या सरपंच सोनिया संजय सावंत यांच्या अनुमतीने साहिल संजय सावंत, सागर परब, अंकित परब, साहिल गावडे, बाबी परब, कृष्णा सावंत, सुरज सावंत, गौरव मुळीक आणि अक्षय सावंत या युवकांनी आवाज उठवला आहे.
“रस्त्याची दुरवस्था तातडीने दूर न केल्यास नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. संबंधित विभागाने व कंत्राटदाराने याची तातडीने दखल घेऊन रस्त्याची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांच्या या मागणीवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने कार्यवाही होणार का, याकडे कुणकेरी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.