loader
Breaking News
Breaking News
Foto

आदिती गुडेकर यांना ‘महाराष्ट्र ग्रामरत्न पुरस्कार २०२६’ प्रदान

चिपळूण (संतोष पिलके) : भारतीय जनता पार्टी चिपळूण तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा तथा भिले गावच्या सरपंच आदिती गुडेकर यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘महाराष्ट्र ग्रामरत्न पुरस्कार २०२६’ (आदर्श सरपंच) हा पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आला. या उल्लेखनीय यशाबद्दल चिपळूण शहर मंडल अध्यक्ष आशिष खातू आणि महिला मोर्चा अध्यक्षा रुही खेडेकर यांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी जिल्हा सरचिटणीस (उत्तर) वसंत ताम्हणकर, जिल्हा सरचिटणीस (दक्षिण) योगेश शिर्के, बळीराम मोरे, अमोलजी भोबस्कर, उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, नगरसेवक शशिकांत मोदी, अंजली कदम, संदीप भिसे, वैशाली निमकर, रसिका देवळेकर यांच्यासह अनिल सावर्डेकर, अभय चितळे, नरेंद्र बेलवलकर, महेश दीक्षित, दीपरत्न देवळेकर, सारिका भावे, संगीता पालकर, रिमा लटके, स्वाती देवळेकर, स्वानंद रानडे, संदेश ओक, संदेश किंजलकर, संदीप आग्रे, उल्हास भोसले, मधुकर निमकर, दिनेश लटके, राकेश दाते, विलास चव्हाण, जगदीश गोरीवले, धिरज खेडेकर, कुणाल आंबेकर, संदीप बोंडकर, विनायक भैरवकर, प्रणय वाडकर, विवेक जाडे, मनोज भैरवकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आदिती गुडेकर यांच्या या सन्मानामुळे चिपळूण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg