loader
Breaking News
Breaking News
Foto

गोठे खलाटी रहाटावर ३ विजय बंधाऱ्यांची ग्रामस्थांनी श्रमदानाने केली उभारणी

मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील गोठे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या 'गोठे खलाटी' येथील रहाटावर (ओढ्यावर) ग्रामस्थांनी लोकसहभागातून आणि श्रमदानाने गोठे ग्रुप ग्राम पंचायतीचे तंटामुक्ती अध्यक्ष संजय बोतरे आणि गोठे ग्राम पंचायत अधिकारी दिपक टेमकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली येथील ग्रामस्थांनी ३ विजय बंधाऱ्यांची यशस्वी उभारणी केली. मंडणगड तालुक्यातील गोठे खलाटी येथील बंधारे बांधण्याचा हा उपक्रम 'मिशन बंधारे' आणि 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना' अंतर्गत राबवण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकणामध्ये पावसाळ्यानंतर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू नये आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी 'पाणी अडवा, पाणी जिरवा' या संकल्पनेतून हा कौतुकास्पद निर्णय घेण्यात आला. गोठे खलाटी येथील स्थानिक ग्रामस्थ आणि महिलांनी अतिशय मेहनतीने ग्रामस्थ आणि महिला सदस्यांची कमी संख्या असुन देखील चिकाटीने आपल्या गावात या वर्षीच्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीत पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावू नये यासाठी घेतलेल्या यशस्वी मेहनतीच्या कामाचे तालुक्यात सर्वत्र ग्रामस्थ आणि महिला सदस्यांच्या एकजुटीचे कौतुक केले जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg