वरवेली (गणेश किर्वे) - रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाच्या सर्व जिल्हा, तालुका, युवक, महिला, क्रिडा शाखांचे पदाधिकारी तसेच सर्व आजीव सभासद, हितचिंतक यांची आँनलाईन व आँफलाईन अशी संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आँनलाईन व आँफलाईन समाज बांधव उपस्थित होते. बैठकीला सुरवात करताना जिल्हा खजिनदार दिनेश नाचणकर यांनी सर्वांचे शाब्दिक स्वागत केले. यानंतर जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी मागील आजपर्यंतच्या कामाचा सर्व आढावा घेत यापुढे हे तेली समाजासाठी स्वाभिमानाचे प्रतीक असलेले तेली समाज भवन उभं करण्यासाठी प्रत्येक तालुक्यांसह रत्नागिरी जिल्ह्याबाहेरुन मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली, पुणे येथे रहाणारे समाज बांधवांशी संपर्क साधून आपल्या प्रोजेक्टची माहिती देऊन आर्थिक सहकार्याच्या माध्यमातून सहभागी करुन घ्यावे अशी विनंती केली. ज्याप्रमाणे आपण आवाहन केल्याप्रमाणे रुपये ५००० कींवा त्यापेक्षा जास्त देणगी देणारे देणगीदारांचे नावं कायम स्वरूपी लिहीणार आहोत त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यातून येणारी देणगी तालुकानिहाय तसेच जिल्ह्याबाहेरील देणगीची नोंद घेऊन कायमस्वरूपी लिहिली जाईल, असे जाहीर केले. त्यामुळे या ऐतिहासिक कामगिरीसाठी प्रत्येक तेली समाज बंधुभगिनींनी समर्पण भावनेने काम करण्याचे आवाहन केले. येवढ्या मोठ्या प्रकल्पाचे शिवधनुष्य उचलण्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची साथ व गरज आहे. आणि यासाठी समित्या स्थापन करायच्या असून या समित्यांमध्ये स्वत:हून सहभागी होण्याचे आवाहन केले. व समित्यांचे स्वरूप कसे असेल ते सांगितले. नियोजन समिती- ही समिती सर्व जिल्हा कार्यकारणी व बिपिन बंदरकर रत्नागिरी, गणपतराव रहाटे चिपळूण, चंद्रकांत झगडे गुहागर, विनायक राऊत गणपतीपुळे मालगुंड रत्नागिरी, मंदार आंब्रे रत्नागिरी अशी समाजबांधवांची मिळून असेल. त्यामुळे सर्व जिल्हा यामध्ये जोडला जाईल. या समितीचे काम सर्व जिल्हाभर, जिल्ह्याबाहेर दौरे आयोजित करुन योग्य नियोजन करणे, सर्व समित्यांमध्ये समन्वय ठेवून कामाचं योग्य नियोजन करणे व सहकार्य करणे.
बांधकाम समिती-प्रभाकर ना. रहाटे रत्नागिरी, आबासाहेब राऊत(आर्किटेक्ट) रत्नागिरी, जितेंद्र प्र.कदम रत्नागिरी, संदीप ल.रहाटे संगमेश्वर, संतोष रा.रहाटे देवरुख, प्रतिक्षा प्र.भोपळकर देवरुख, अमोल स. लांजेकर रत्नागिरी. ह्या समितीची जबाबदारी इमारत बांधकामासाठी सर्व तांत्रिक बाजू सांभाळून आवश्यक तेथे सगळे निर्णय घेऊन इमारत पूर्ण करणे. निधी संकलन समिती-संतोष पावसकर संगमेश्वर, शशिकांत कोतवडेकर रत्नागिरी, प्रदीप आंब्रे रत्नागिरी, प्रकाश लांजेकर लांजा, श्रीकृष्ण(बापू) राऊत चिपळूण, अनिल लांजेकर चिपळूण, प्रकाश झगडे गुहागर, समीर महाडिक गुहागर, राजेश झगडे दापोली, अमोल जाधव मंडणगड, संदीप सारंगकर खेड, विद्याधर राणे राजापूर, अर्जुन(भाऊ) लांजेकर राजापूर, सचिन लांजेकर रत्नागिरी, सचिन(बबलू)कोतवडेकर रत्नागिरी, रुपेश शेलार रत्नागिरी, मकरंद पावसकर रत्नागिरी, निलेश कोतवडेकर रत्नागिरी,नारायण झगडे रत्नागिरी, काशिनाथ सकपाळ रत्नागिरी, अनंत भडकमकर रत्नागिरी, राकेश आंब्रे रत्नागिरी, अजय नाचणकर रत्नागिरी, संदीप चव्हाण लांजा, प्रफुल्ल खानविलकर मुंबई, रोहिणी महाडिक मुंबई, दिगंबर भडकमकर मुंबई, पुंडलिक रहाटे ठाणे, नितीन लांजेकर मुंबई, प्रविण रहाटे मुंबई, सुजितकुमार रसाळ ठाणे, कमलाकर शेलार ठाणे, विनायक ताम्हणकर मुंबई, राजाराम खानविलकर पुणे, श्रेया महाडिक चिपळूण, प्रियंका भोपळकर देवरुख या समितीची जबाबदारी समाजातील जास्तीत जास्त बंधुभगिनींशी संपर्क साधून आपल्या समाजभवनची माहिती पटवून देऊन निधी संकलन करणे.
अर्थ समिती-दिपक राऊत जिल्हा कार्याध्यक्ष, संदीप पवार जिल्हा सचिव, दिनेश नाचणकर जिल्हा खजिनदार या समितीची जबाबदारी सर्व आर्थिक व्यवहार नियमानुसार व्यवस्थित सांभाळणे व निधी वितरीत करणे. या सर्व समित्या सर्वानुमते निवड झाल्यावर आपल्या या समित्यांचे काम पारदर्शक व प्रभावी होण्यासाठी संतोष पावसकर, शशिकांत कोतवडेकर, आबासाहेब राऊत, प्रभाकर रहाटे, बबनशेठ किर्वे, दिपक राऊत, प्रफुल्ल खानविलकर (मुंबई), श्रीकृष्ण (बापू) राऊत, नारायण झगडे, दिनेश नाचणकर, राजाराम खानविलकर, (पूणे), नितीन लांजेकर (मुंबई )यांनी आपल्या भावना व अपेक्षा मनोगतातून व्यक्त केल्या. यानंतर शशिकांत कोतवडेकर यांनी आँनलाईन व आँफलाईन या संयुक्त सभेला उपस्थित राहीलेल्या सर्व समाज बंधुभगिनींचे तसेच तांत्रिक सहाय्य करणारे उदयोन्मुख इंजिनिअर आर्यन अजय नाचणकर व दिनेश नाचणकर इत्यादी सर्वांचे आभार मानले व धन्यवाद देऊन सभा संपल्याचे जाहीर केले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.