loader
Breaking News
Breaking News
Foto

मुरुड गणेश आळीतील रस्त्यावर काढण्यात आलेला गतीरोधक बसविण्यात आला, सागर चौलकर यांनी दिला होता आमरण उपोषणाचा इशारा

कोर्लई, (राजीव नेवासेकर) - रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता लक्षात घेऊन नगरपरिषदेला अर्ज विनंत्या करून मुरुडच्या गणेशआळी ते सुपारी संघ दरम्यान बसविण्यात आलेला गतीरोधक (स्पिडब्रेकर) काढण्यात आला. याला वरदहस्त कोणाचा ?असा सवाल नागरिक सागर चौलकर यांनी वृत्तपत्रात वृत्त देण्यात येऊन उपस्थित केला होता आणि काढण्यात आलेला गतीरोधक तातडीने बसविण्यात न आल्यास नगर परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला होता. अखेर नगरपरिषद प्रशासनाने दखल घेऊन गणेश आळीतील काढण्यात आलेला गतीरोधक बसविण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गणेश आळी ते सुपारी संघ दरम्यान रस्त्यावर बसविण्यात आलेला गतीरोधक बसविण्यात यावा, यासाठी दि. २१/०९/२०२६ रोजी गतिरोधक बसविण्याबाबत अर्ज सादर केला असून मागील दोन वर्षांपुर्वी देखील गतिरोधक बसविण्याबाबत अर्ज केलेला होता. येत्या दोन दिवसांमध्ये माझे मागणीप्रमाणे गणेशआळी येथे माझे घरासमोर किंवा आपल्याला योग्य वाटेल त्याठिकाणी माझे परिसरामध्ये गतीरोधक बसवून न मिळाल्यास अन्यथा याविरोधात दि. १६/१०/२०२६ रोजीपासुन दुपारी १२.०० वाजल्यापासुन आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्यावाचून मला कोणता पर्याय राहाणार नाही.

टाईम्स स्पेशल

आमरण उपोषणादरम्यान माझे जिवाचे काहीही बरेवाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर व प्रशासनावर राहील. असे सागर चौलकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते. सदरचे वृत्त वृत्तपत्रातून देण्यात आले होते. अखेर नगरपरिषद प्रशासनाने दखल घेऊन गणेश आळीतील काढण्यात आलेला गतीरोधक बसविण्यात आल्याने सामाजिक कार्यकर्ते सागर चौलकर यांनी समाधान व्यक्त केले असून नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष विरेंद्र भगत व सर्व नगरसेवक, अधिकारी वर्गाचे आभार मानले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg