loader
Breaking News
Breaking News
Foto

ऑनलाइन देयक सेवेत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त पोलीस सागर मुरुडकर यांचा सन्मान

देवरुख (सुरेश सप्रे ) : शासनाच्या आपले सरकार’ पोर्टलवरील ऑनलाइन देयक सेवा नागरिकांपर्यंत जलद व पारदर्शक पद्धतीने पोहोचविण्याच्या कामात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल रत्नागिरी पोलीस दलातील देवरुख पोलीस स्थानकातील पोलीस हवालदार कॉन्स्टेबल सागर विजय मुरुडकर (ब.नं. ३२४२) यांचा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देवरुख पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार सागर मुरुडकर यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवरील ऑनलाइन देयक सेवा नागरिकांपर्यंत जलद, सुलभ व पारदर्शक पद्धतीने पोहोचविण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला . त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत रत्नागिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.या प्रशस्तीपत्रात मुरुडकर यांच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक करण्यात आले असून, भविष्यातही आवश्यकतेनुसार अशाच प्रकारे उत्तम कामगिरी बजावत पोलीस दलाचे नाव उज्ज्वल करावे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. सागर मुरुडकर यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल देवरुख पोलीस निरीक्षक यादव यांचेसह देवरुख व रत्नागिरी पोलीस दलातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg