loader
Breaking News
Breaking News
Foto

को.ए.सो. जनता विद्यालय बेलोशी एस. एस. सी. बॅच -१९८९ च्या मैत्रीचा आनंदमय स्नेह मेळावा जल्लोषात

अलिबाग - माजी विरोधी पक्षनेते दिवंगत दत्ता पाटील यांचे को.ए.सो. जनता विद्यालय बेलोशी, तालुका - अलिबाग, जिल्हा -रायगड या हायस्कुल मधील एस. एस. सी. बॅच -१९८९ यांच्या मैत्रीचा आनंदमय सोहळा अलिबाग तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नागाव नगरीतील प्रसिद्ध वातावरण रिसॉर्ट मध्ये आनंदमय वातावरणात मैत्रीचा व आपुलकीचा धागा घट्ट पकडून संपन्न झाला. याप्रसंगी ३५ मित्र / मैत्रिणी यांनी उपस्थित राहुन ३७ वर्षाचा मैत्रीच्या भेटीचा दुष्काळ संपविला. यासाठी मित्रवर्य महेंद्र औचटकर यांचा पुढाकार वाखाणण्याजोगी होता. त्यानां सर्वांची तोलामोलाची साथ लाभली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीयुत शिक्षक मित्र नितीन वारगे व दिनेश तुरे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले, या कार्यक्रमाची सुरुवात अविरत मेहनत घेणारे अरुण खंडागळे व सहकारी यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच भारतीय संस्कृतीच्या परंपरेनुसार सर्व मित्रांच्या हस्ते प्रतिमा पुजण करण्यात आले व उपस्तिथ मैत्रिणी यांच्या हस्ते प्रकाशमय दीप प्रज्वलित करून सदर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. दिनेश तुरे यांनी आपल्या दिवंगत मित्रानां - प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, कोरोना मधील दिवंगत नातेवाईक व सीमेवरील शहीद सैनिक या सर्वाना श्रद्धांजली वाहिली, सर्व मित्र आपल्या दिवंगत मित्रांच्या आठवणीत निशब्द झाले. शिक्षक मित्र नितीन वारगे यांनी सदर कार्यक्रमाची प्रास्ताविकाद्वारे छान सुरुवात केली. तसेच दिनेश तुरे यांनी ३७ वर्षाच्या मैत्रीच्या भेटीची ओढ व होणारा आनंद सविस्तर विषद केला. भारती मोरे यांनी देखील मित्र व मैत्रीचा भेटीचा दुष्काळ संपल्याबद्दल आनंद व्यक्त केला व प्रत्येक मैत्रिणींची सविस्तर माहिती देऊन त्याचे स्वागत केले.

टाईम्स स्पेशल

सर्व मित्रांची माहिती नितीन वारगे व दिनेश तुरे यांनी दिली व टप्प्याटप्याने सर्वांना व्यासपीठावर बोलावून त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. प्रत्येक मित्र व मैत्रिणी यांनी ३७ वर्षातील आपल्या मैत्रीचा दुष्काळ, वैवाहिक जीवन, मुलांची माहिती व पत्नीचा आधार अघोरीत करून आपली शाळा व जुन्या आठवणींना व आपल्या मैत्रीला उजाळा दिला व हास्याचे फवारले उडविले. श्रीयुत नितीन वारगे, दिनेश तुरे व भारती मोरे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कार्यक्रमात रंगत आणली व शिक्षिका शरयू काटले व रंजना तुरे याची देखील उत्तम साथ लाभली. तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निवास पाटील, अरुण खंडागळे, किशोर वारगे, महेश पाटील, सुजीत पाटील, रवींद्र शिंदे, उदय सांदणकर, दिनेश तुरे, शिरीष तुरे, महेश गावंड, जगदीश चेरकर, व सर्वच मित्र/ मैत्रिणी यांनी दूरवरून येऊन अमूल्य वेळ देऊन व प्रचंड मेहनत घेऊन सदर कार्यक्रम यशस्वी होण्यास खारीचा वाटा उचलला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg