loader
Breaking News
Breaking News
Foto

आरोंदा तंटामुक्ती अध्यक्षपदी मनोहर आरोंदेकर यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड

आरोंदा गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी मनोहर (बाळा) आरोंदेकर यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत ग्रामस्थांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. गावातील विविध वादविवाद सामोपचाराने मिटविणे, ग्रामस्थांमध्ये सलोखा राखणे आणि गावात शांततामय वातावरण निर्माण करण्यासाठी तंटामुक्ती समिती महत्त्वाची भूमिका बजावते. या पार्श्वभूमीवर मनोहर (बाळा) आरोंदेकर यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याने ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या निवडीबद्दल मनोहर आरोंदेकर यांनी ग्रामस्थांचे आभार मानले असून, गावातील एकोपा व शांतता टिकवण्यासाठी यापुढेही प्रामाणिकपणे काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg