loader
Breaking News
Breaking News
Foto

घरफोडी करणार्‍या चौघांना खांदेश्वर पोलिसांकडून अटक; नऊ गुन्ह्यांची उकल, ५ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

कळंबोली (प्रतिनिधी) - पनवेल तालुक्यातील सुकापूर परिसरातील दुकानफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना खांदेश्वर पोलिसांनी घरफोडी व मोबाईल चोरी करणार्‍या चौघांना अटक केली असून, त्यांच्या चौकशीत घरफोडीचे तब्बल नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून सुमारे ५ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. १२ सप्टेंबर रोजी सुकापूर येथील मालेवाडी स्टॉप परिसरातील विजय लक्ष्मी इलेक्ट्रिक अँड हार्डवेअर या दुकानाचे कुलूप व शटर तोडून चोरट्यांनी मोबाईल फोन व रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप माने व त्यांच्या पथकाने सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे नहीद आलम मोहम्मद जलाल (सुकापूर), तजमुल कमरुल खान (सेक्टर १९, वाशी), अश्फाक असदुद्दीन आलम (वाशी) आणि नाझीम मोहम्मद जलाल शेख (सेक्टर १९, वाशी) अशी आहेत. पोलिसांच्या तपासात आरोपींकडून खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील चार, पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील दोन आणि रबाळे पोलीस ठाणे हद्दीतील तीन, असे एकूण नऊ घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

टाइम्स स्पेशल

या उल्लेखनीय कामगिरीबाबत १ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी खांदेश्वर पोलीस ठाण्यात पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मयुर भुजबळ यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी पोलिसांच्या तपासाबाबत माहिती दिली. खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्यासह संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तांत्रिक तपास, पथकाची मेहनत आणि आरोपींची चौकशी यांच्या माध्यमातून एकाच कारवाईत नऊ गुन्ह्यांची उकल झाल्याने खांदेश्वर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg