loader
Breaking News
Breaking News
Foto

वरवेली येथे महापुरुष सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ आणि सिद्धिविनायक मंडळातर्फे दोन वनराई बंधारे जलसंवर्धनासाठी मंडळांचा पुढाकार

वरवेली (गणेश किर्वे) - भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्यासाठी जलसंवर्धनाच्या कामात लोकसहभाग महत्त्वाचा ठरत आहे. याच उद्देशाने महापुरुष सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, गुहागर आणि सिद्धिविनायक मंडळ, वरवेली यांच्या संयुक्त विद्यमाने वरवेली-मराठवाडी येथे दोन वनराई बंधारे बांधण्यात आले. वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून जलसंवर्धनाचा संदेश देतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न दोन्ही मंडळांनी केला. अशा उपक्रमांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये पाणी बचत, पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी संदेश कलगुटकर, कुणाल देसाई, केदार मालप, प्रविण रहाटे, युवराज शिर्के, रोहीत विचारे, प्रथमेश कदम, स्वप्नील राऊत, हर्षल बावधनकर, अभिजित गोळे, रोमित कलगुटकर, आरुष कलगुटकर, प्रशांत रहाटे, संतोष गुहागरकर, दीपक जाधव, प्रसाद बोले, शुभम भायनाक, सिद्धीविनायक मंडळ अध्यक्ष आशीष विचारे, दीपक विचारे, शेखर विचारे, सागर देसाई, बंटी शिंदे, सौरभ विचारे, यश विचारे, चिराग विचारे, चैतन्य नारकर, चैतन्य विचारे, शैलेश नारकर, संकेत विचारे यांनी मेहनत घेतली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg