loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

मालवण (प्रतिनिधी) - आपल्या जीवनात वाचनाचे मोठे महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी महान व्यक्तींची चरित्रे आवर्जून वाचली पाहिजेत आणि ज्ञानवर्धनासाठी ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी केले. मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग आणि एन.एस.एस. (NSS) विभागाच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक करताना ग्रंथपाल संग्रामसिंह पवार यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवन प्रवासाचा सविस्तर परिचय करून दिला. अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व पटवून दिले. प्रा. हसन खान यांनी डॉ. अब्दुल कलाम यांचे भारतीय संरक्षण क्षेत्रातील मोलाचे योगदान विद्यार्थ्यांसमोर मांडले.

टाईम्स स्पेशल

यानिमित्त ग्रंथालयातर्फे रहस्य व भय कथा- कादंबऱ्यांच्या पुस्तकांचे विशेष प्रदर्शन आयोजित केले होते. सोबतच डॉ. अब्दुल कलाम यांनी लिहिलेली आणि त्यांच्या जीवनावर आधारित विविध पुस्तकेही प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. या ग्रंथ प्रदर्शनास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी भेट देऊन लाभ घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg