loader
Breaking News
Breaking News
Foto

आचऱ्यात ‘नाचू दे गौळण, गावूया अभंग’ कार्यक्रमातून भक्तिरसाची बरसात

मालवण (प्रतिनिधी) - आचरे येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान तर्फे आयोजित कार्तिकोत्सव २०२६ निमित्त ‘नाचू दे गौळण, गावूया अभंग’ हा भक्तिमय आणि सांस्कृतिक कार्यक्रम श्री रामेश्वर मंदिर, आचरा येथे सोमवारी रात्री पालखी सोहळ्यानंतर संपन्न झाला. दशक्रोशीतील स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात सात संघांनी उत्स्फूर्त सहभाग घेत गौळणी आणि अभंगांच्या सादरीकरणातून उपस्थितांना भक्तिरसात न्हाऊ घातले. कार्यक्रमाच्या प्रारंभी देवस्थानचे वर्सलदार महादेव मिराशी यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी अनिल करंजे यांनी पाणी बचतीचे महत्त्व विशद करून पाणी संवर्धनाबाबत माहिती दिली. त्यानंतर प्रत्यक्ष सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमात श्री विठ्ठल रखुमाई आचरा देऊळवाडी येथील लहान मुलींनी ध्वनिफितीच्या माध्यमातून गौळण आणि अभंग सादर केले. परडेकर मित्रमंडळ आचरा यांनी ‘गौळणी संगती गाऱ्हाणी’ ही गौळण आणि ‘तुझा माझा देवा कारे वैराकार’ हा अभंग सादर केला. निरंकारी महापुरुष त्रिंबक यांनी ‘कान्होबा रे तू माझा’ ही गौळण, तर ‘का रे देवा माझा तुझा’ हा अभंग सादर केला. साई समर्थ ग्रुप आचरा यांनी ‘घागर घेवून निघाली’ या गौळणीसह ‘खेळ मांडियेला वाळवंटी’ हा अभंग सादर केला. श्री बाळगोपाळ मंडळ आचरा वरचीवाडी यांनी ‘कान्हा माझी घागर गेली’ ही गौळण आणि ‘लागलीसी आस मजला’ हा अभंग सादर केला. श्री ब्राह्मणदेव आचरा पारवाडी यांनी ‘कृष्ण सख्याची बाधा’ ही गौळण आणि ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हा अभंग सादर केला. श्री विठ्ठल रखुमाई आचरा यांनी ‘कशी मी जाऊ मथुरे बाजारी’ ही गौळण आणि ‘कानडा राजा पंढरीचा’ हा अभंग सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. गौळणींच्या माध्यमातून कृष्णभक्तीचा आनंद, तर अभंगांच्या सादरीकरणातून संतविचारांचा जागर करण्यात आला. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच संतांची परंपरा आणि लोकसंस्कृती अधिक समृद्ध करणारा हा उपक्रम ठरला.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाला आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, चावल मुजावर, कमल परुळेकर, पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर, आशिष बागवे, अभय भोसले, अजित घाडी, गीता चंद्रा नायर, महेश राणे, चंदू कदम, रवींद्र गुरव, मांगरीश सांबारी, कपिल गुरव, आबा सावंत, संदीप नलावडे, शेखर मोर्वेकर, संतोष कोदे, जयप्रकाश परुळेकर, रवींद्र पाटील, गुरुप्रसाद कांबळी, प्रफुल्ल घाडी, विनोद पाडावे, पंकज आचरेकर, गजू गावकर यांनी प्रायोजक म्हणून सहकार्य केले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व सात संघांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत त्यांच्या सहभागाचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश भिरंवडेकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg