loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणात तुळशी विवाहाची जय्यत तयारी सुरू, तुळशी वृंदावनाच्या रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात

कोकणात सध्या तुळशी विवाहाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. कार्तिक महिन्यातील तुळशी विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर घरोघरी लगबग पाहायला मिळत आहे. तुळशी विवाहासाठी घरासमोरील तुळशी वृंदावनाची स्वच्छता करून त्याला आकर्षक रंगरंगोटी केली जात आहे. अनेक ठिकाणी तुळशी वृंदावनाला विविध रंगांनी सजविण्यात येत असून, रंगरंगोटीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. काही ठिकाणी तुळशी वृंदावनाभोवती आकर्षक सजावटही करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीची पूजा करून पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा साजरा केला जाणार आहे. कोकणात ही तुळशी विवाह परंपरा अजूनही मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी केली जाते. कोकणातील घरोघरी या मंगलमय सोहळ्याची उत्सुकता असून, बाजारपेठांमध्येही तुळशी विवाहासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीची लगबग दिसून येत आहे. त्यामुळे संपूर्ण कोकणात तुळशी विवाहाचे धार्मिक आणि उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg