loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड लाटवण येथे विजेच्या तारेचा तीव्र धक्का लागून १० वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

खेड (प्रतिनिधी) - मंडणगड तालुक्यातील लाटवण येथे विजेच्या मुख्य प्रवाहातील तुटलेली तार पायाला चिकटल्याने बसलेल्या भीषण धक्क्यामुळे एका दहा वर्षाच्या निष्पाप बालकाचा जागीच तडफडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मयुर अनिल पवार (वय १०, रा. लाटवण आदिवासीवाडी, ता. मंडणगड) असे या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण लाटवण परिसरावर तीव्र शोककळा पसरली असून, मंडणगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, मयुर पवार हा ३ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे सातच्या सुमारास घरातून कोयती घेऊन बाहेर पडला होता. मात्र, दुपारचे दोन वाजले तरी तो घरी परतला नसल्याचे त्याची चुलती लता घोगरेकर यांनी मयुरचे मामा संदीप धाकट्या घोगरेकर यांना सांगितले. त्यानंतर कुटुंबीय आणि स्थानिक ग्रामस्थांनी परिसरात त्याचा कसून शोध सुरू केला. शोध सुरू असतानाच, रात्री सुमारे आठच्या सुमारास लाटवण हायस्कूलजवळील बांबूच्या बेटाजवळ असलेल्या सिमेंटच्या इलेक्ट्रिक पोलजवळ मयुर उताण्या अवस्थेत पडलेला प्रशांत गंगाराम पवार यांना दिसून आला. स्थानिकांनी जवळ जाऊन पाहिले असता, विजेच्या मुख्य वाहिनीची तार मयुरच्या दोन्ही पायांना चिकटलेली होती. विजेच्या अतिउच्च दाबाच्या प्रवाहामुळे त्याच्या दोन्ही पायांना गंभीर भाजल्यासारख्या जखमा झाल्या होत्या आणि विजेचा जोरदार झटका बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले.

टाईम्स स्पेशल

संदीप घोगरेकर यांनी दिलेल्या माहितीवरून मंडणगड पोलिसांनी BNSS कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक १८/२०२६ नुसार नोंद केली असून, पोलीस या दुर्घटनेचा पुढील तपास करत आहेत. लाटवण परिसरात विजेच्या तारा लोंबकळत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही ग्रामस्थांनी केल्या होत्या. अशा निष्काळजीपणामुळेच एका निष्पाप बालकाचा बळी गेला असल्याने संताप व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg