खेड - निधीअभावी महाडायलिसिस प्रकल्पांतर्गत राज्यातील डायलिसिस सेंटर अचानक बंद झाल्याने किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, खेड, चिपळूणसह अन्य ठिकाणच्या डायलिसिस केंद्रांचे कामकाज बंद झाल्याने नियमित डायलिसिसवर अवलंबून असलेल्या रुग्णांचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीची राज्याचे गृहराज्यमंत्री तथा दापोली-मंडणगड-खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी तातडीने दखल घेतली आहे. जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णाची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. महाडायलिसिस प्रकल्पाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील किडनी निकामी झालेल्या रुग्णांना मोफत डायलिसिसची सुविधा दिली जात आहे.
ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी ही योजना मोठा आधार ठरली आहे. राज्यभरात या प्रकल्पांतर्गत २०८ डायलिसिस केंद्रे कार्यरत होती. मात्र, प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध न झाल्याने आणि मोठ्या प्रमाणात देयके थकीत राहिल्याने डायलिसिस सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा परिणाम रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, खेड, चिपळूणसह अन्य भागांतील डायलिसिस रुग्णांवर झाला आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करणे आवश्यक असलेल्या रुग्णांना अचानक उपचारांसाठी पर्यायी व्यवस्था शोधण्याची वेळ आली. खासगी रुग्णालयांमध्ये डायलिसिसचा खर्च मोठा असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसमोर उपचार सुरू ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. ही परिस्थिती लक्षात येताच आमदार योगेश कदम यांनी तातडीने आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. जिल्ह्यातील महाडायलिसिस सेंटर बंद झाल्यामुळे कोणत्याही रुग्णाचे उपचार थांबता कामा नयेत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य खासगी रुग्णालयांमधील डायलिसिस सेंटरमध्ये संबंधित रुग्णांची तातडीने डायलिसिस प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे आदेश त्यांनी दूरध्वनीवरून दिले आहेत. रुग्णांचे डायलिसिस वेळेवर होणे अत्यंत महत्त्वाचे असून निधीअभावी त्यांचे उपचार थांबणे योग्य नाही. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करून कोणत्याही रुग्णाची गैरसोय होऊ देऊ नये, अशी भूमिका योगेश कदम यांनी घेतली आहे. त्यांच्या या तातडीच्या हस्तक्षेपामुळे जिल्ह्यातील डायलिसिस रुग्णांना पर्यायी उपचार व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डायलिसिस उपचारात खंड पडल्यास रुग्णांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बंद पडलेली महाडायलिसिस केंद्रे पुन्हा सुरू होण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तोपर्यंत रुग्णांचे नियमित उपचार सुरू राहावेत, यासाठी आरोग्य विभागाने तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.