loader
Breaking News
Breaking News
Foto

रायगड लोकसभा संपर्क प्रमुखांच्या दौऱ्याने दापोली शिवसेनेमध्ये चैतन्य

दापोली (प्रतिनिधी) : दापोलीत रायगड लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय मानाजी कदम यांनी दौरा केल्याने शिवसेनेमध्ये कमालीचे चैतन्य निर्माण झाले आहे. 32 रायगड लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्कप्रमुख संजय मानाजी कदम यांनी दापोलीचा धावता दौरा केला. यावेळी शिवसेना संपर्क कार्यालयात त्यांच्या स्वागतासाठी दापोली तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले होते. या धावत्या दौऱ्यात कदम यांनी शिवसेना संघटन अधिक मजबूत करण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे असा आदेश दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संपर्क प्रमुखांनी या भेटीदरम्यान विविध विषयांवर दापोलीतील शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिकांशी सकारात्मक चर्चा केली. त्यामुळे शिवसैनिकांसह पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीचे चैतन्य निर्माण होऊन मोठा उत्साह वाढला आहे. या भेटीदरम्यान शिवसेना विधानसभा क्षेत्राध्यक्ष मुजीब रुमाणे, तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटीका मानसी विचारे, जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव, तालुका सरचिटणीस नरेंद्र करमरकर, शहरप्रमुख संदीप चव्हाण, माजी नगराध्यक्ष ममता मोरे, विक्रांत गवळी, विभाग प्रमुख रमेश बहीरमकर, शहर समन्वयक प्रदीप गमरे, साईराज मोरे, प्रकाश मयेकर, विजय बागकर, सुर्यकांत म्हसकर आदींसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी दापोली तालुका शिवसेनेतर्फे संपर्क प्रमुख संजय कदम यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या दौऱ्यानंतर संपर्क प्रमुख कदम यांनी दाभोळ येथील भुयारातील स्वयंभू चंडिका देवी चे दर्शन घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg