loader
Breaking News
Breaking News
Foto

बागतळवडे येथे जल अर्पण महोत्सव व पोषण महाअभियान उत्साहात

देवगड (प्रतिनिधी) - जलजीवन मिशनअंतर्गत तळवडे ग्रामपंचायतीच्या बागतळवडे येथे जल अर्पण महोत्सव व पोषण महाअभियान पंचायत समिती देवगड उपसभापती अमोल लोके, जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम व पंचायत समिती सदस्य सलोनी तळवडेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात भजन, फुगडी व विविध जनजागृतीपर उपक्रमांच्या माध्यमातून जलसंवर्धन, पाणी बचत, पाणी गुणवत्ता आणि पोषण आहाराचा जागर करण्यात आला. यावेळी उपसभापती अमोल लोके म्हणाले की, जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच ग्रामपंचायत, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, स्वयंसहाय्यता गट आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पाण्याची बचत व जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे. पोषण महाअभियानांतर्गत शिरगाव बीट मधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सादर केलेल्या पोषण फुगडी व भजनांचे त्यांनी कौतुक केले. अशा कलांच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर प्रत्येक गावात व्हावा, यासाठी या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये जलजीवन मिशनची उद्दिष्टे, पाणी बचत, जलसंवर्धन व पाण्याच्या गुणवत्तेबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच पोषण महाअभियानांतर्गत सकस व संतुलित आहाराचे महत्त्व पर्यवेक्षिका पुजा सावंत यांनी पटवून दिले . तसेच जि.प. सदस्य देवदत्त कदम यांनी मार्गदर्शन करत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या यावेळी जलसुरक्षक मकरंद घुले यांचा विशेष सत्कार उपसभापती अमोल लोके यांनी केला. जल अर्पण महोत्सवानिमित्त गावातून जलदिंडी काढण्यात आली. यावेळी पाण्याचा काटकसरीने वापर, जलस्रोतांचे संवर्धन व संरक्षण याबाबत जनजागृती करण्यात आली. जलबंधन, पाणी गुणवत्तेबाबत मार्गदर्शन आणि जलसंकल्प शपथ असे विविध उपक्रम राबविण्यात आले. ग्रामस्थांना शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच गावातील जलस्रोतांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाला प्रशासक गंगुताई अडुळकर, पर्यवेक्षिका पुजा सावंत ,माजी सरपंच गोपाळ रुमडे, पंकज दुखंडे, बागतळवडेचे पोलीस पाटील राजू साटम , बागतळवडे गावचे अध्यक्ष अनिल साटम , उपाध्यक्ष रामजी भाटकर, स्वीय सहाय्यक दिपक मयेकर , तळेबाजार पोलीस पाटील मानसी माणगांवकर, माजी. ग्रा.प. सदस्य भावना शिंगरे, माजी. उपसरपंच भाग्यश्री धुरी, कनिष्ठ अभियंता ( ग्रा.पा.पु) चव्हाण, जीवन प्राधिकरणाचे अधिकारी महादेव पाटील, ग्रामपंचायत अधिकारी गुणवंत पाटील, गटसमन्वयक वैशाली मेस्त्री, पाणी समन्वयक हर्षदा बोथीकर, केशव भाटकर, बाळा परूळेकर, समिक्षा साटम , तन्वी साटम, जलसुरक्षक मकरंद घुले, शिरगांव बीट मधील अंगणवाडी सेविका, मदतनिस, तसेच बागतळवडे गावातील बचतगट प्रतिनिधी, आशा व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी गुणवंत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विनायक धुरी यांनी केले, तर आभार पोलीस पाटील राजू साटम यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg