loader
Breaking News
Breaking News
Foto

विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचे महायुतीचे स्वप्न भंग, अंतर्गत गटबाजीचा फटका

पुणे - विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीची मोजणी कालपासून सुरु आहे. या निवडणुकीत महायुतीला एकतर्फी यश मिळण्याची शक्यता होती. त्यादृष्टीने नियोजन महायुतीच्या नेत्यांनी केले होते. मात्र राजकीय हवा बदलली आहे. महाविकास आघाडीचा सामना महायुतीला करावा लागला. ५ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत महायुतीला ३ तर महाविकास आघाडीला २ जागा मिळताना दिसताहेत. सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचे महायुतीचे स्वप्न भंग झाल्याचे दिसून येत आहे. महायुती अंर्गत गटबाजीमुळे हा धोका पत्करावा लागणार आहे. मराठवाड्यात महाविकास आघाडी, नागपूरमध्ये कराळे भविष्य ठरविणार, अमरावतीत शिंदेंचा डंका, पुण्यात भाजप आघाडीवर तर पुणे पदवीधर मध्ये शरद पवारांचा डंका दिसून आला. मराठवाड्यात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील हे आघाडीवर आहेत. तर महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण पिछाडीवर आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांना ७३९३१ मते मिळाली आहेत. तर महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना ६०७६८ मते मिळाली आहेत. रविराज साबळे यांना १९८३५ मते मिळाली आहेत. प्रतापसिंह पाटील १३१६३ मतांनी आघाडीवर आहेत. या निवडणुकीत शिंदे सेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा उघड प्रचार केला होता. त्याचा फटका चव्हाण यांना बसताना दिसत आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीची सुधाकर कोहळे हे आघाडीवर आहेत. त्यांना ६०,९२४ मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे अभिजीत वंजारी यांना ५६,६३० मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांना २४,२४९ मते मिळाली आहेत. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये महायुतीचे कोहळे आघाडीवर दिसत असले तरी नितेश कराळे यांनी दुसर्‍या पसंतीची मते अभिजीत वंजारी यांना द्यायला सांगितलं होतं. त्यामुळे दुसर्‍या पसंतीच्या मतांमध्ये गेम पालटणार की आहे तीच परिस्थिती राहणार हे पाहावं लागणार आहे.

टाईम्स स्पेशल

अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाचा उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे उमेदवार किरण सरनाईक यांना ८५७५ मते मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या अदिती पोहरे यांना ४९२५ मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना ४९२१ मते मिळाली आहेत. त्यामुळे सरनाईक यांचा विजय निश्चित मानला जात आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे. भाजपचे कौस्तुभ गावडे यांना १७६०० मते मिळाली आहेत. काँग्रेसचे जयंत आसगावकर यांना ८३५० तर शिंदे गटाचे सचिन सानप यांना ११३२८ मते मिळाली आहेत. त्यामुळे पुणे राखण्यात भाजप यशस्वी होताना दिसत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या स्मिता जाधव यांना १ लाख २ हजार मते मिळाली आहेत. तर शरद पवार गटाच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांना १ लाख १२ हजार ४०० मते मिळाली आहेत. तर उद्धव ठाकरे गटाचे सुनील मोदी यांना ३०६६ मते मिळाली आहेत. त्यामुळे या मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg