loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर तालुका काजू प्रक्रिया धारक संघटनेची सभा संपन्न

देवळे - संगमेश्वर तालुक्यातील काजू प्रक्रिया धारक संघटनेची सभा दिनांक १२ रोजी देवरुख येथील यशराज काजू फॅक्टरी येथे मोठ्या उत्साहात पार पडली. संगमेश्वर तालुक्यातील काजू उद्योजकांच्या या सभेला तालुक्यातील सुमारे २० सदस्य उपस्थित होते. या सभेला रत्नागिरी जिल्हा काजू प्रक्रिया धारक संघटनेचे नूतन अध्यक्ष विवेकशेठ बारगीर, सदस्य तौफिक उपस्थित होते. संगमेश्वर तालुका प्रक्रिया धारक संघटनेच्या वतीने संदीप टिळेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन बारगीर यांचे स्वागत केले, तसे तौफिक यांचे प्रकाश करंडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. जिल्हास्तरावरील संघटनेच्या कामाची व शासकीय योजनांची माहिती अध्यक्ष विवेक बारगीर यांनी या बैठकीमध्ये दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यापुढे तालुक्यातील प्रत्येक काजू प्रक्रिया धारक यांनी आपल्या अडीअडचणी व मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी एकसंघ होण्याची गरज आहे, असे विवेक बारगीर यांनी सांगितले. म्हणून जास्तीत जास्त सदस्यांनी आपली नाव नोंदणी करावी जेणेकरून शासनाकडून येणार्‍या योजनांचा लाभ प्रत्येक छोट्या मोठ्या कारखानदारापर्यंत पोहोचवता येईल नव्हे तर त्याला पोहचला पाहिजे, असे हि म्हटले. यापुढे आमदार भैय्या सामंत आपल्या संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून लवकरच कृषी विभाग, महाराष्ट्र पणन महामंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती, महाराष्ट्र काजू बोर्ड अशा काजू प्रकल्पांशी संबंधित प्रमुख अधिकारी आणि रत्नागिरी जिल्हा काजू प्रक्रिया धारक संघटना यांची रत्नागिरी येथे संयुक्त बैठक आमदार भैय्या सामंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार असल्याचे प्रकाश चाळके यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

संगमेश्वर तालुक्यातील काजू प्रक्रिया धारक संघटनेची बैठक यशस्वी करण्यासाठी सुनिता पाटील, संदीप टिळेकर यांनी प्रयत्न केले. प्रकाश करंडे यांनी काजू कारखानदारांच्या व्यथा व अडचणी मांडल्या. बँक लेव्हलला कारखानदारांना येणार्‍या अडचणीही मांडल्या. एकूणच चर्चेतून काजू बोर्डाकडून तालुकास्तरावर गोदामाची व्यवस्था होऊन काजूबीचा स्टॉक करण्यात यावा, जेणेकरून तालुक्यातील कारखानदारांना कमीत कमी १० महिने तरी कारखाने चालवता येतील, अशी मागणी करण्यात आली. यापुढेही तालुक्यातील काजू प्रक्रिया धारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तालुक्यातील काजू कारखानदारांना करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg