loader
Breaking News
Breaking News
Foto

तारकर्लीतील ज्येष्ठ मूर्तिकार, नाट्य कलावंत रतीलाल तारी यांचे निधन

मालवण (प्रतिनिधी) - तारकर्ली येथील ज्येष्ठ गणेशमूर्तिकार, नाट्य कलावंत व सामाजिक कार्यकर्ते आप्पाजी श्रीधर तारी उर्फ रतीलाल तारी (८२) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. आज शनिवारी तारकर्ली येथे बहुसंख्य मूर्तिकार, नाट्य कलावंत व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रतीलाल तारी यांनी वयाच्या १३व्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केले. तब्बल ५० वर्षे त्यांनी नाट्यकलेची सेवा केली. उत्तम गणेशमूर्तिकार म्हणूनही त्यांची स्वतंत्र ओळख होती. अनेक मूर्तिकार व नाट्य कलावंतांना त्यांनी मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

साधी राहणी, मनमोकळा स्वभाव, सेवाभाव, कलाप्रेम आणि माणुसकी जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते. त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक व कलात्मक योगदानाची दखल घेत अष्टपैलू कलानिकेतन, मालवणतर्फे त्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनाने नाट्य, मूर्तिकला व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, भाऊ, बहिणी, जावई, नातवंडे व पतवंडे असा परिवार आहे. श्रीधर आप्पाजी उर्फ सूर्यनारायण तारी यांचे ते वडील तर नीलेश दूधवडकर यांचे सासरे होत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg