loader
Breaking News
Breaking News
Foto

नावडी संगमेश्वर येथे श्री देव गणपती मंदिर हॉलमध्ये नेत्र तपासणी शिबिर उत्तम प्रतिसादाने संपन्न

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर पंचक्रोशीतील तमाम जनसामान्यांना चांगल्या दर्जाची नेत्र तपासणी करता यावी,‌ नियमित असणारे पेशंट यांना संगमेश्वर‌ या जवळच्या ठिकाणी उच्च दर्जाच्या डाॅक्टरांकडून डोळ्यांविषयींच्या लहानसहान गोष्टी निर्भिडपणे लोकांनी डॉक्टरांना सांगून योग्य समस्या जाणून घेण्यासाठी संधी मिळावी, अशा महत्वाच्या उदात्त उद्देशाने इन्फिगो हॉस्पिटल अंतर्गत संगमेश्वर तालुका केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशन आणि संगम ज्येष्ठ नागरिक संघ संगमेश्वर परिसर व लायन्स क्लब संगमेश्वर आयोजित असलेले मोफत नेत्र तपासणी शिबिर रेटीना (डोळ्याचा पडदा) व तिरळेपणा तपासणी शिबिर मंगळवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत संगमेश्वर येथे गणपती मंदिर हॉल या ठिकाणी संपन्न झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिबिरामध्ये नेत्र तपासणी, दृष्टी तपासणी, रेटीना तपासणी, चष्म्याचा नंबर तपासणी, दृष्टीआरोग्य तपासणी, अशा तपासण्या मोफत करण्यात आल्या. यासाठी रेटिना स्पेशलिस्ट डॉ. प्रसाद कामत यांचा संपूर्ण भारतात २५ वर्षाचा अनुभव असून, डॉ.प्रदीप देशपांडे यांचा २५ हजार पेक्षा जास्त तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया केल्याचा अनुभव आहे. या शिबिरामध्ये संगमेश्वर पंचक्रोशीतून डोळ्यांच्या पेशंटनी उत्तम प्रतिसाद दिला. १८१ जणांनी लाभ घेतला असून, त्यांना औषधे देण्यात आली आहेत. शिबिरामध्ये सहभागी डॉ. प्रसाद कामत, डॉ.प्रदीप देशपांडे, डॉ.रिबिका इरोम, डॉ. श्रीधर ठाकूर तसेच त्यांचे सहकारी संकेत शिंदे, केतन गुरव, सागर देवळे अशा मंडळींचा सहभाग होता.

टाईम्स स्पेशल

हे शिबिर यशस्वी होण्यासाठी केमिस्ट आणि ड्रगिष्ट असोशियनचे नितीन खातू, स्वरूप खातू, नील खातू, अभी कोळपे, मेमन, मोबीन मालगुंडकर, मयूर खरात, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रमोद शेट्ये, उदय संसारे, जनार्दन शिरगांवकर, प्रमोद भिंगार्डे, यशवंत सैतवडेकर, सत्यवान विचारे, बी.डी.साळवी, विनायक पाथरे, विनय मुरकर, रामभाऊ दोरकडे तसेच लायन्स क्लब सदस्य मनिष चोचे, सुशांत कोळवणकर, योगेश भिंगार्डे अशा मंडळींनी मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg