सावंतवाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिआय मानांकित सेंद्रिय काजूला चांगला भाव मिळाला तर शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करून प्रकिया उद्योग सुरू केला पाहिजे. त्यातून स्वतःच्या काजूला मार्केटिंग करून योग्य भाव मिळवून देऊ शकतो असा विश्वास इंडो लॅटिन अमेरिका चेंबर उपाध्यक्ष व्ही पी व्ही मूर्ती यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्ग मधील जीआय मानांकित काजू बिला योग्य भाव मिळावा व काजूगरांना आंतरराष्ट्रीय मार्केट मिळावे यासाठी प्रयत्न करणारा सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघ आयोजित बैठकीला व्ही पी व्ही मूर्ती, उपाध्यक्ष इंडो लॅटिन अमेरिका चेंबर ऑफ कॉमर्स यांनी मार्गदर्शन केले. सिंधुदुर्ग मधील सेंद्रिय काजू बी व त्यातही जीआय मानांकन असलेल्या काजू गरांना परदेशामध्ये प्रचंड मागणी असून कार्पोरेट जगतामध्ये जीआय मानांकन माल प्रचंड प्रमाणात खपतो त्यामुळे ऑरगॅनिक एग्रीकल्चरल मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी होणे आवश्यक असून सिंधुदुर्ग फळबागायतदारने यामध्ये पुढाकार घेऊन ही सहकारी संस्था स्थापन करावी, अशी सूचना श्री मूर्ती यांनी केली. तमिळनाडू व इतर ठिकाणी स्थापन केलेल्या अनेक सहकारी संस्थांची माहिती त्यांनी दिली. काजू आपला परंतु मार्केटिंग करून हळदीराम सारख्या प्रसिद्ध असलेल्या कंपनीने यामध्ये प्रचंड नफा कमावलेला असून आपणही सहकारी संस्थेच्या माध्यमातून ही गोष्ट साध्य करू शकतो यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही मूर्ती यांनी दिली. बांदेश्वर दूध उत्पादक सहकारी संस्था बांदा येथेही बैठक आयोजित करण्यात आली होती.
गोव्यामध्ये काजू फेणी ही दीडशे ते दोनशे रुपये प्रति बॉटल विकली जाते परंतु आपण मोग रस ब्रँड तयार करून मार्केटिंग करून हीच काजूची बॉटल परदेशामध्ये २५०० रुपयांनी विकतो हे त्यांनी स्वतःचं उदाहरण देऊन स्पष्ट केलं. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या बारामती पॅटर्नचेही त्यांनी तोंडभर कौतुक केले. जगभरातील मार्केटिंग मॉल सिंधुदुर्गातील चवदार काजूसाठी उत्सुक आहेत. त्यामुळे अशी संस्था लवकर चालू करून येत्या हंगामात काजू खरेदी करून प्रोसेसिंग करून आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पाठविण्याचे आवाहनही त्यांनी केले. सिंधुदुर्ग बागायतदार प्रोडूसर कंपनीचे ही त्यांनी कौतुक करून शेतकऱ्यांच्या काजूला वाजवी भाव देण्याचे अतुलनीय कामगिरी ही कंपनी करत आहे, याबद्दल गौरवोदगार काढले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग फळबागायतदार संघटनेचे अध्यक्ष विलास सावंत होते तर व्यासपीठावर सह्याद्री काजू प्रक्रिया सहकारी संस्था चेअरमन चंद्रशेखर देसाई, नर्सरी संघटनेचे अध्यक्ष विकास म्हाडगूत, विजय प्रभू, संजय देसाई उपस्थित होते. जिल्हाभरातून पन्नास पेक्षा जास्ती काजू उत्पादक शेतकरी व अनेक संघटनेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुर्ती यांनी शेतकऱ्यांच्या विविध शंकांचेही आंतरराष्ट्रीय दाखले देऊन निरसन केले. प्रगतशील काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याने अशा प्रकारची ऑरगॅनिक एग्रीकल्चरल मार्केटिंग मॅन्युफॅक्चरिंग को-ऑपरेटिव्ह संस्था स्थापन करण्याचे सर्वानुमते ठरले.
दहा संचालक व दोनशे भागधारक या संस्थेसाठी निर्धारित करून इतर शेतकऱ्यांना सामान्य सदस्यत्व दिले जाणार आहे. येत्या आठवड्याभरात संचालकांची नावे फायनल करून संस्था उभारणीसाठी ताबडतोब प्रयत्न केले जाणार आहेत, असे प्रतिपादन विलास सावंत यांनी केले. चंद्रशेखर देसाई यांनी ऑरगॅनिक प्रमाणपत्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी न्याय देण्याबद्दलची मागणी मूर्ती यांच्याकडे केली. या बैठकीस नारायण गावडे, नितीन मावळणकर, गोपाळ करमळकर, विष्णू सावंत, जगदेव गवस, शिवप्रसाद देसाई, अशोक सावंत, राकेश धरणे, संतोष देसाई, सुगंध नरसुले, कळणे सरपंच अजित देसाई, अभिमन्यू लोंढे, दीपक देसाई, बाबाजी नांगरे, धनंजय गवस, बाबुराव परब, प्रमोद दळवी, महादेव होडावडेकर, प्रभाकर सरवटे, आदर्श मोरस्कर, रामचंद्र चराटकर, विश्वनाथ राऊळ, धर्माजी गावडे, संजय लाड, उत्तम देसाई, हरिश्चंद्र भिसे, प्रा. महेंद्र ठाकूर, रत्नदीप धुरी, प्रकाश दळवी, गुणाजी गवस, सिताराम देसाई, दत्ताराम सावंत, प्रणव नाडकर्णी, गितेश समर्थ, गणपत दळवी, तुषार गवस, प्रवीण कावले इत्यादी मान्यवर काजू प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.