loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मंडणगड शिरगावातील गायमुख येथे ७ बंधाऱ्यांची उभारणी

मंडणगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) उमेद अभियान मंडणगड पंचायत समितीच्या शेनाळे नूतन ग्रामसंघ कार्यालयाच्या पुढाकाराने शिरगाव गायमुख येथे ७ वनराई बंधारे यशस्वीरित्या उभारण्यात आले आहेत. उमेद अभियानपंचायत समिती मंडणगड हा उपक्रम ग्रामीण भागातील जलसंधारण आणि महिला सक्षमीकरणाचा एक आदर्श नमुना ठरला आहे. मंडणगड तालुक्यातील शिरगाव ग्रुप ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील हद्दीत शिरगाव गायमुख या ठिकाणी गाव पातळीवरील महिला स्वयंसहाय्यता गटांना एकत्रित आणून तयार झालेल्या ग्रामसंघाने स्वतः श्रमदान आणि नियोजनाची जबाबदारी सांभाळत ७ बंधाऱ्यांची निर्मिती केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव तालुका मंडणगड यांच्यावतीने शिरगाव गायमुख येथे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या श्रमदानाच्या कामात शिरगाव गावचे सुपुत्र आणि मंडणगड पंचायत समितीचे माजी सभापती राजकुमार निगुडकर, शिरगाव ग्रुप ग्राम पंचायतीचे माजी सरपंच विश्वनाथ सावंत, गणेश पेंढारे, ग्रामपंचायत प्रशासक कदम, ग्रामपंचायत अधिकारी हुमणे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व कर्मचारी, शेनाळे ग्रामसंघ सदस्या आणि शिरगावचे मुंबईकर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

मंडणगड तालुक्यातील शिरगाव महसुली गावातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आणि उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी हे बंधारे अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. या बंधाऱ्यांमुळे अडवलेल्या पाण्याचा वापर शेती, पशुपालन आणि शेतीपूरक व्यवसायांसाठी होऊन गावकऱ्यांच्या उपजीविकेला बळ मिळणार आहे. मंडणगड पंचायत समितीच्या योग्य मार्गदर्शनामुळे आणि 'उमेद' अभियानाच्या सामाजिक समावेशनाच्या धोरणामुळे हा सामूहिक विकास प्रकल्प यशस्वी झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg