loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमधील प्रसिद्ध उद्योजक उत्तमकुमार जैन यांच्या कार तोडफोड प्रकरणाचा पोलिसांकडून छडा; पाचपैकी तीन आरोपी अटकेत!

खेड शहरातील प्रसिद्ध उद्योजक उत्तमकुमार जैन यांच्या कारची कळंबणी येथील महानगर गॅस सीएनजी पंपावर तोडफोड केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ३१ मे २०२६ रोजी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत पाच जणांनी जैन यांच्याशी वाद घालत त्यांचा मोबाईल आणि कारची चावी हिसकावून घेतली होती. तसेच त्यांच्या कारच्या दर्शनी काचेची तोडफोड केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. सहा पोलीस निरीक्षक पी. एस. येवले, दीपक गोरे, व्ही. एस. सातर्डेकर, किरण सकपाळे, सोहेल ढगे आणि विकास पवार यांनी विशेष मेहनत घेत पाचपैकी तीन आरोपींना अटक केली आहे. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार, क्रमांक MH 04 MR 6572, पोलिसांनी जप्त केली आहे. उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती खेड पोलिसांनी दिली आहे. अनेक महिन्यांपूर्वी घडलेल्या या गुन्ह्याचा छडा लावत तीन आरोपींना अटक करणाऱ्या खेड पोलिसांच्या तपास पथकाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg