वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वरवेली येथील श्री हसलाई देवी देवस्थान समितीच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त श्री हसलाई देवी मंदिरात ‘नवदुर्गा सन्मान’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शिक्षण, आरोग्य, प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या गावातील कर्तृत्ववान महिलांचा या सोहळ्यात सन्मान करून स्त्रीशक्तीच्या कार्याचा गौरव करण्यात आला. महिलांच्या हळदीकुंकू कार्यक्रमानिमित्त आयोजित या सोहळ्यापूर्वी सुवासिनींच्या हस्ते कुमारिका पूजन करण्यात आले. त्यानंतर महिलांचे कर्तृत्व, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि सेवाभावी कार्याची दखल घेत विविध क्षेत्रांत कार्यरत महिलांना ‘नवदुर्गा सन्मान’ देण्यात आला.
या सोहळ्यात वरवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील माजी महिला सरपंच, ग्रामपंचायतीच्या महिला सदस्य, वाड्यांच्या महिला अध्यक्ष, शासकीय सेवेत कार्यरत महिला, सामाजिक क्षेत्रातील महिला पदाधिकारी तसेच ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला. वरवेली जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ आणि वरवेली शिंदेवाडी येथील शिक्षिका, महसूल विभागातील महिला अधिकारी, वरवेली आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका व आरोग्य सहाय्यक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचाही गौरव करण्यात आला. यासोबतच वायरमन, पोस्टमास्तर, ग्रामपंचायत शिपाई आणि डेटा ऑपरेटर आदी पदांवर सेवा बजावणाऱ्या महिलांच्या कार्याचीही दखल घेण्यात आली.
गावाच्या दैनंदिन जीवनात विविध जबाबदाऱ्या सांभाळत समाजासाठी योगदान देणाऱ्या महिलांच्या कार्याला या उपक्रमातून सन्मानाचे व्यासपीठ मिळाले. महिला मंडळाच्या वतीने देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिमरन सागर देसाई आणि लक्ष्मी आशिष विचारे यांनी केले. सन्मान सोहळ्यानंतर उपस्थित महिलांनी गरबा नृत्याचा आनंद घेतला. धार्मिक परंपरा, महिलांच्या कार्याचा गौरव आणि सांस्कृतिक सहभाग यांचा संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री हसलाई देवी देवस्थान समिती, वरवेली आणि गावातील सर्व महिलांनी परिश्रम घेतले.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.