loader
Breaking News
Breaking News
Foto

आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अंबरनाथच्या आदिवासी पाड्यात ‘आपुलकीची दिवाळी’ उत्साहात साजरी

अंबरनाथ - दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे समाजातील अनेक गरजू कुटुंबांना हा सण अपेक्षित आनंदाने साजरा करता येत नाही. अशा वंचित आणि गरजू कुटुंबांच्या आयुष्यात आनंदाची ज्योत प्रज्वलित व्हावी, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलावे आणि त्यांनाही दिवाळीचा आनंद अनुभवता यावा, या उदात्त हेतूने आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अंबरनाथ येथील आदिवासी पाड्यात ‘आपुलकीची दिवाळी’ हा सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत आदिवासी पाड्यातील गरजू कुटुंबांना दिवाळीचा फराळ, महिलांना नवीन साड्या, घरात प्रकाशाची रोषणाई करण्यासाठी आकर्षक कंदील, लहान मुलांना फटाके, शालेय उपयोगी साहित्य तसेच थंडीपासून संरक्षणासाठी ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिवाळीच्या निमित्ताने मिळालेल्या या भेटवस्तूंमुळे आदिवासी पाड्यातील महिला, लहान मुले आणि कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे हास्य फुलले. विशेषतः लहान मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस आनंद आणि उत्साहाने उपस्थितांचे मन जिंकले. त्यांच्या आनंदात सहभागी होत ट्रस्टच्या सदस्यांनीही दिवाळीचा खरा आनंद अनुभवला. ‘दिवाळीचा आनंद केवळ आपल्या घरापुरता मर्यादित न राहता तो समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे,’ या विचारातून हा उपक्रम राबविण्यात आला. समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देणे, त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करणे आणि माणुसकी, प्रेम व आपुलकीची भावना अधिक दृढ करणे हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

टाईम्स स्पेशल

या सामाजिक उपक्रमाला सढळ हस्ते मदत करणाऱ्या सर्व दानशूर देणगीदारांचे तसेच उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व सदस्यांचे ट्रस्टच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. त्यांच्या आर्थिक मदतीमुळे, सहकार्यामुळे आणि सामाजिक जाणिवेमुळेच गरजू कुटुंबांच्या आयुष्यात आनंदाची दिवाळी साकारता आली. खऱ्या अर्थाने दिवाळी ही केवळ दिव्यांची रोषणाई नसून दुसऱ्याच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्याचे पर्व आहे. प्रेम, माणुसकी, मदतीची भावना आणि आपलेपणाची ऊब देणारी ‘आपुलकीची दिवाळी’ हा उपक्रम आदिवासी बांधवांसाठी आनंदाचा आणि अविस्मरणीय अनुभव ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg