loader
Breaking News
Breaking News
Foto

पालपेणे कुंभारवाडी येथे श्रमदानातून बांधले तब्बल सात वनराई बंधारे

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील पालपेणे कुंभारवाडी येथे गावातील ग्रामस्थांनी श्रमदानातून तब्बल सात वनराई बंधारे बांधले आहेत. भविष्यातील भीषण पाणी टंचाई, खालावलेली भूजल पातळी आणि येणाऱ्या दुष्काळाचे सावट ओळखून वेळीच सतर्क झालेल्या कुंभारवाडी ग्रामस्थांनी एक अत्यंत स्तुत्य आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल उचलले आहे. सोमवारचे औचित्य साधून गावातील तरुणांनी एक-दोन नव्हे तर तब्बल सात ठिकाणी मातीचे बंधारे बांधून पाणी अडवण्याचा आणि जिरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या उपक्रमात श्री ओम सत्यनारायण नवतरुण मित्र मंडळ यांनी 4 बंधारे, श्री सन्मित्र लोककला मित्र मंडळ यांनी 2 बंधारे आणि श्री वरदान देवी नवतरुण मंडळ, देऊळवाडी यांनी 1 बंधारा असे एकूण सात बंधारे श्रमदानातून बांधले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपण केलेले हे कार्य केवळ कौतुकास्पदच नाही तर संपूर्ण तालुक्यासाठी गौरवास्पद आणि प्रेरणादायी आहे. आपल्या या अनमोल आणि स्तुत्य उपक्रमाबद्दल आपले मनःपूर्वक आभार. भविष्यातही पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अशाच प्रकारचे सखोल आणि विविध उपक्रम राबवून आपला गाव पाण्याने कायम समृद्ध कसा राहील, यासाठी आपणा सर्वांचे असेच सहकार्य अपेक्षित आहे. या उपक्रमाला पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे आणि शृंगारतळी पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ, कोतळूक ग्रामपंचायत उपसरपंच सचिन ओक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांचे मनापासून कौतुक केले. सभापती प्रणव पोळेकर आणि उपसभापती निलेश सुर्वे यांनी पाणी टंचाई बाबत, पाण्याचे नियोजन आणि भविष्यात करण्यात येणाऱ्या उपाय योजना याबाबत लागणारे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

टाईम्स स्पेशल

तसेच असगोली पंचायत समिती सदस्य उर्वी उमेश खैर यांनी स्वतः उपस्थित राहून श्रमदान करून ग्रामस्थांचे आभार मानले. यावेळी पालपेणे ग्रामपंचायत अधिकारी पेडणेकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी राजेश घाणेकर, गायकर आणि प्रशांत घाणेकर हे देखील उपस्थित होते. पालपेणे ग्रामपंचायत आणि गावातील सर्व ग्रामस्थांचे या कार्यासाठी विशेष सहकार्य लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg