रत्नागिरी: कोकणातील दापोली येथे प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला होणार्या स्थानिक विरोधापासून ते राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पक्षचिन्हाच्या कायदेशीर संघर्षावर खासदार सुनील तटकरे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. दापोली येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत सामंजस्य करार झाल्याचे वाचनात आल्याचे सांगत तटकरे यांनी स्थानिकांच्या भावनांना पाठिंबा दर्शवला. कोकणात रासायनिक प्रकल्प येऊ नयेत ही स्थानिक शेतकरी आणि कोकणवासीयांची ठाम भूमिका आहे. दापोली हे ब्रिटिशांच्या काळापासून थंड हवेचे ठिकाण असून त्याला निसर्गाचे मोठे वरदान लाभले आहे. त्यामुळे येथे पर्यटनावर आधारित रोजगाराच्या विपुल संधी आहेत. अणुऊर्जा ही राष्ट्राची गरज असली तरी दापोलीची नैसर्गिक वैशिष्ट्ये आणि पर्यटनाचा विचार करून सरकारने याबाबत योग्य तो सारासार विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
आगामी दापोली दौर्यादरम्यान आपण स्वतः शेतकर्यांशी चर्चा करणार असून, स्थानिकांची जी भूमिका असेल तीच मुख्यमंत्र्यांसमोर आक्रमकपणे मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४१ आमदारांचे एक महिन्याचे वेतन दुष्काळ निवारणासाठी देण्याचा निर्णय सुनेत्रा पवार यांनी घेतल्याचे सांगितले. शरद पवार यांच्या १२ मागण्यांवर भाष्य करताना तटकरे म्हणाले की, पवार साहेब सहा दशकांपासून राजकारणात असून त्यांना राज्यातील शेती आणि प्रत्येक तालुक्याची उत्तम जाण आहे. त्यांनी शेतकर्यांच्या हिताचीच भूमिका मांडली असून मुख्यमंत्री त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करतील. सध्या राज्य सरकार दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे असून मंत्रिमंडळ आणि तिन्ही प्रमुख नेते थेट शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातूनही शेतकर्यांना मोठी मदत पुरवली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडणूक आयोगावरील काँग्रेसच्या मोर्चावर उत्तर देताना त्यांनी निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असून त्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसतो, असे स्पष्ट केले. ठाकरे बंधूंच्या सहभागाबाबत बोलताना, प्रत्येकाला आपापली राजकीय भूमिका घेण्याचा अधिकार असून हा वैचारिक लढ्याचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. पश्चिम बंगालमधील पक्षचिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय घेईल, असे ते म्हणाले. तसेच, दापोलीतील वक्फ बोर्ड प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन अल्पसंख्याक मंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे चौकशीची विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूरमधील महसूल अधिकार्याच्या व्हायरल व्हिडिओवर बोलताना, शेतकर्यांना त्रास देणार्या कोणत्याही अधिकार्यावर मुख्यमंत्री कडक कारवाई करतील, असा इशारा खासदार सुनील तटकरे यांनी दिला.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.