loader
Breaking News
Breaking News
Foto

माध्यमिक विद्यालय वरवडे येथे स्व. इंदिरा गांधी जयंती उत्साहात साजरी

रत्नागिरी (जमीर खलफे) : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वर्गीय इंदिरा गांधी यांची जयंती गुरुवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी माध्यमिक विद्यालय, वरवडे येथे उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ शिक्षिका गोडबोले यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रशालेचे मराठी विषयाचे शिक्षक मगर यांनी आपल्या ओघवत्या वक्तृत्वातून आणि अभ्यासपूर्ण तयारीतून इंदिरा गांधी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. त्यांचे शिक्षण, राजकीय कारकिर्दीची सुरुवात, पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास, तसेच सुरुवातीच्या काळात विरोधकांकडून त्यांच्यावर केली जाणारी ‘गुंगी गुडिया’ ही टीका याविषयी त्यांनी माहिती दिली. त्याचबरोबर १९६९ मधील बँकांचे राष्ट्रीयीकरण, १९७१ मधील महत्त्वपूर्ण घडामोडी, १९७५ ते १९७७ या कालावधीतील आणीबाणी, त्यानंतर झालेला निवडणुकीतील पराभव आणि पुन्हा निवडून येत पंतप्रधानपदी विराजमान होण्यापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास त्यांनी समर्पक शब्दांत उलगडून सांगितला. त्यांचे मार्गदर्शन ऐकताना विद्यार्थी आणि शिक्षक पूर्णपणे तल्लीन झाले होते.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका सावंत होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात इंदिरा गांधी यांच्या जीवनकार्याविषयी तसेच इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या महत्त्वपूर्ण बाबींविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याच दिवशी प्रशालेतील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी यश लाकडे याचा वाढदिवस असल्याने त्यालाही उपस्थितांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख जंगम यांनी केले. फलकलेखनासाठी कुंभार यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक जगताप आणि पर्यवेक्षक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्रशालेतील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg