loader
Breaking News
Breaking News
Foto

मुणगे भगवती हायस्कूलचे मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश

देवगड (प्रतिनिधी) - येथील श्री भगवती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कुस्ती, मैदानी स्पर्धा आणि क्रॉसकंट्री स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. विजयी विद्यार्थ्यांची जिल्हा व विभागीय स्तरावर निवड झाली असून, त्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कुस्ती स्पर्धेत १४ वर्षांखालील वयोगटात वृषभ धुवाळी याने ४८ किलो वजन गटात तालुका व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रिद्धिमा घाडी हिने ५९ किलो वजन गटात तालुकास्तरावर प्रथम, तर जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला. श्लोक धुवाळी याने ३८ किलो वजन गटात द्वितीय, तर आर्या कांबळे हिने ४६ किलो वजन गटात तृतीय क्रमांक मिळविला. १७ वर्षांखालील वयोगटात मेघेश वळंजू याने ४५ किलो वजन गटात प्रथम, जय सावंत याने ४८ किलो वजन गटात द्वितीय, तर जनार्दन पटकारे याने ४५ किलो वजन गटात तृतीय क्रमांक पटकावला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg