loader
Breaking News
Breaking News
Foto

चिखली येथील गुरांच्या बाजाराला मान्यवरांची भेट; बाजाराच्या उपक्रमाचे केले कौतुक....!

वरवेली (गणेश किर्वे) - रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश सावंत आणि चिखली ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी चिखली कारूळ फाटा येथील "विरंगणा" मैदानावर सुरू करण्यात आलेल्या गुरांच्या बाजाराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश सावंत, डॉ. चंद्रकांत मोकल, भगवान कदम, ग्रामपंचायत सरपंच मानसी कदम, उपसरपंच सुभाष दळवी, ग्रामपंचायत सदस्य विजय गमरे, तंटामुक्ती अध्यक्ष मयुर गमरे, डॉ. प्रकाश शिर्के, अशोक साळवी, महेश साळवी, रत्नदीप गमरे यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बाजारात दाखल झालेल्या जनावरांची पाहणी करण्यात आली. ग्रामीण भागातील शेतकरी, पशुपालक आणि व्यापाऱ्यांना स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध व्हावी, तसेच गुरांची खरेदी-विक्री करण्यासाठी चांगली सुविधा मिळावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाबाबत उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. दर मंगळवारी भरणाऱ्या या गुरांच्या बाजारामुळे परिसरातील शेतकरी, पशुपालक आणि व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg