loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग तालुक्यात ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाने झोडपले, जनजीवन विस्कळीत

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यात गेले काही दिवस ऑक्टोबर महिन्यात थंडीची चाहुल लागणे बाजूला उलट प्रंचड उष्णता वाढली होती. पाऊस पडावा असे वाटत होते. यातच हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज दिला होता. दोडामार्ग मध्ये दोन दिवस ढगाळ वातावरण होते. शनिवारी रात्री उशिरा दोडामार्ग तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या. पण सोमवारी (१९ ऑक्टोबर) दुपारी आकाशात काळाकुट्ट अंधार करत आलेल्या वादळी पावसाने दोडामार्ग तालुक्यात झोडपून काढले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास साटेली भेडशी दशक्रोशीतील गावात ढगांच्या गडगडाटासह, तसेच विजांचा लखलखाट करत सोसाटयाच्या वार्‍यासह दाखल झालेल्या वादळी पावसाने अनेक गावांना झोडपून काढले. साटेली वरचीवाडी सातेरी मंदीर कडे जाणार्‍या रस्त्यावर वीज वाहिन्यांवर झाडाची मोठी फांदी पडून वीज खांब देखील तुटून पडले यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला. आता अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी पुरता निराश झाला आहे. हातातोंडाशी आलेल्या भातशेतीला देखील फटका बसला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg