खेड (प्रतिनिधी ) दीपावलीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि परंपरेचा संगम. या सणाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा, खेड यांच्या वतीने शहरात 'दीपोत्सव' या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव खेडेकर यांच्या संकल्पनेतून भव्य किल्ले आणि आकाशकंदील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धांना शहरातील बालगोपाळ, तरुण आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धांना मिळालेला प्रतिसाद पाहता आयोजकांनीही समाधान व्यक्त केले. दरम्यान, भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अॅड. मिलिंद उर्फ दादू नांदगावकर आणि भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळुंखी यांनी स्पर्धास्थळी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी स्पर्धकांनी तयार केलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती आणि आकाशकंदिलांची पाहणी केली. प्रत्येक कलाकृतीमागील कल्पना आणि मेहनत जाणून घेत स्पर्धकांशी संवाद साधला. मुलांनी आणि तरुणांनी दाखविलेल्या कलात्मकतेचे त्यांनी विशेष कौतुक केले.
किल्ले स्पर्धेबरोबरच आयोजित करण्यात आलेल्या आकाशकंदील स्पर्धेलाही चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धकांनी विविध आकाराचे, रंगसंगतीचे आणि आकर्षक सजावटीचे आकाशकंदील तयार केले होते. पारंपरिक कलाकुसरीबरोबरच आधुनिक कल्पनांचा वापर करून पर्यावरणपूरक आकाशकंदील साकारण्यावरही सहभागींचा भर होता. मुलांच्या या कलाकृतीमधून त्यांची कल्पकता, मेहनत आणि सर्जनशीलता दिसून आली.पाहणी दौऱ्याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे खेड तालुकाध्यक्ष विशाल होळकर, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष स्वराज गांधी, भाजपा शहर सरचिटणीस अभिलाष डबे, शहर उपाध्यक्ष प्रणव म्हसुकर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
दिवाळीत संस्कृती आणि सर्जनशीलतेचा संगम: - दीपावलीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे मुलांना स्वतःच्या कलागुणांना वाव देण्याची संधी मिळाली.- त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, गड-किल्ल्यांचे महत्त्व आणि पारंपरिक सणांमागील सांस्कृतिक मूल्ये समजून घेण्यास मदत झाली.- केवळ स्पर्धा आयोजित करण्यापुरता मर्यादित न राहता पुढील पिढीमध्ये ऐतिहासिक वारशाविषयी अभिमान, सांस्कृतिक जाणीव आणि सर्जनशीलता रुजविण्याचा प्रयत्न या 'दीपोत्सव' उपक्रमातून करण्यात आला.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.