रत्नागिरी, - येथील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिराचे प्रांगणातील श्री देवी तुळजाभवानी देवस्थानात घटस्थापना दि. ११ ऑक्टो. पासून सलग १० दिवस नवरात्रोत्सव साजरा होत असून आज मंगळ. दि. २० ऑक्टो. २०२६ रोजी ‘राजेशाही दसरा’ हा सोहळा राजेशाही थाटात संपन्न होईल. या सोहळ्याला सर्व बंधू भगिनी व भाविकांनी आवर्जून उपस्थित रहावे व राजेशाही थाटाचा दसरा प्रत्यक्ष अनुभवावा, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीही या देवस्थानात ‘राजेशाही दसरा’ सोहळा साजरा करण्यात येणार आहे. सोम. दि. १९ ऑक्टो. २०२६ रोजी रिवाजानुसार प्रात:काळी श्री देवी तुळजाभवानीची षोडशोपचारपूर्वक पूजा, अभिषेक व आरती संपन्न झाली. यावेळी सुप्रसिद्ध विधीज्ञ अॅड. विनय आंबुलकर व त्यांच्या पत्नी अॅड. सौ. शाल्मली आंबुलकर या दांपत्याने यजमानपद भूषविले. देवीची पूजा संपन्न झाल्यावर मंदिर भाविकांना खुले करण्यात आले.
यानंतर सायंकाळी रांगोळी व मेहंदी स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मुक्तेश्वरी दिलीप पाखरे व इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रो. आदिती शारंगधर यांनी परीक्षक म्हणून कार्य केले. त्यानंतर पाककृती स्पर्धा, रांगोळी व मेहंदी स्पर्धा या स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह व सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ‘राजेशाही दसरा’ सोहळा मंगळ. दि. २० ऑक्टो. २०२६ रोजी सायंकाळी ठिक ४ ते ५ या वेळेत श्री देवी तुळजाभवानी देवस्थान, श्रीराम मंदिर, श्रीराम आळी, रत्नागिरी येथे संपन्न होईल. या सोहळ्याला अनेक मान्यवर अतिथी तसेच ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या इतिहास पुरुषांच्या वारसांची उपस्थिती लाभणार असल्याचे श्री. नित्यानंद दळवी यांनी सांगितले. सोहळ्याच्या सुरुवातीला प्रथम प्रभू श्रीराम व देवी तुळजाभवानी समोर सर्वांच्या कल्याणासाठी गार्हाणे घालण्यात येईल. ‘राजेशाही दसरा’ सोहळ्याचे प्रसंगी ११ यजमान दांपत्ये उपस्थित असतील तसेच त्यासाठी ७ पुरोहितांची टिम सज्ज ठेवण्यात आली आहे. या ‘राजेशाही दसरा’ सोहळ्याचे वेळी होणार्या सर्व धार्मिक विधींचा थाट हा थेट राजेशाही काळाप्रमाणे असेल व सर्व विधी वदोक्त मंत्रघोषात संपन्न होतील.
सर्वप्रथम सर्व यजमान दांपत्यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात येईल. शस्त्रपूजन होताच सर्व यजमानांच्या हस्ते वेदोक्त पद्धतीने शमीपूजन करण्यात येईल. त्यानंतर सर्व यजमान दांपत्यांच्या हस्ते शृंगारलेल्या अश्वांचे पूजन केले जाईल. ते झाल्यावर आपटा वृक्ष पूजन करण्यात येईल. हे सर्व विधी एका मागोमाग एक झपाट्याने संपन्न होतील. त्यानंतर सर्व यजमान दांपत्ये खांद्यावर तलवारी घेऊन सोने लुटण्यासाठी जातील. सर्वप्रथम या यजमान दांपत्यांच्या हस्ते सोने लुटणे कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येईल. शुभारंभ होताच सर्व उपस्थित भाविकांना मनसोक्त सोने लुटण्याची संधी देण्यात येईल. सर्वजण आपल्या इच्छेप्रमाणे कितीही सोने नेऊ शकतात. सर्वात शेवटी ‘पायनापल शिरा’चा महाप्रसाद देण्यात येईल व या ‘राजेशाही दसरा’ सोहळ्याची सांगता होईल. पूर्वीच्या काळी राजे महाराजे दसरा साजरा करीत असत तशाच पद्धतीने व तशाच रिवाजाने हा ‘राजेशाही दसरा’ सोहळा संपन्न होईल. तरी या ‘राजेशाही दसरा’ सोहळ्याला सर्व नागरिकांनी, बंधू भगिनींनी व भाविकांनी आवर्जून उपस्थित रहावे आणि तुळजाभवानी दर्शनासोबतच मनसोक्त सोने लुटण्याचा आनंद घ्यावा असे आवाहन श्री तुळजाभवानी देवस्थानतर्फे श्री. संदीप डोंगरे व नित्यानंद दळवी यांनी केले आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.