loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमधील लवेल येथे कंपनीच्या गोडावूनसमोरून ३,८०० मीटर कंडक्टर वायर चोरीला; खेड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लवेल येथे ‘लीना पॉवरटेक इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या गोडावूनसमोरून कंडक्टर वायर चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. दिलेल्या अहवालानुसार, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ते २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या कालावधीत ही घटना घडली असून, याप्रकरणी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजून ३३ मिनिटांनी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कंपनीच्या गोडावूनसमोरील मोकळ्या आवारात लाकडी ड्रममध्ये ठेवलेली एकूण ३८०० मीटर लांबीची (AAAC २३२ mm2 डायमीटर) जुनी वापरती कंडक्टर वायर अज्ञात चोरट्याने परवानगीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेली. या प्रकरणी फिर्यादी अखिलेशकुमार श्रीलालप्रसाद प्रजापती (वय ४८, रा. सध्या हनुमानपेठ, चिखले अपार्टमेंट, गांधीचौक, ता. खेड, जि. रत्नागिरी; मूळ/सध्या विरार ईस्ट, जि. पालघर) यांनी तक्रार दिली असून, अज्ञात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

या चोरीप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. गोडावून परिसरातील सीसीटीव्ही, तसेच भंगार विक्रेत्यांकडे विक्री झाली का, याबाबतही पोलीस तपास करत आहेत. लवेलसारख्या औद्योगिक पट्ट्यात दिवसाढवळ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वायर चोरीला गेल्याने परिसरातील उद्योजक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कंपनीच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणीही होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg