loader
Breaking News
Breaking News
Foto

खासगी आरोग्य क्षेत्राची व्याप्ती व क्षमता सार्वजनिक आरोग्याच्या प्राधान्यक्रमांशी जोडण्यात येणार ,राज्यस्तरीय ‘लिव्हिंग लॅब’ विकसित करण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून स्तुत्य उपक्रम

मुंबई : महाराष्ट्राच्या ‘सर्वांसाठी आरोग्य’ या ध्येयाला पूरक ठरणारी आरोग्य नवोन्मेष आणि गुणवत्ता सुधारणेसाठीची राज्यस्तरीय ‘लिव्हिंग लॅब’ विकसित होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. आरोग्य सुविधांचा दर्जा आणि गुणवत्ता मानकांचे पालन सुधारण्यासह राज्यातील नागरिकांसाठी कौशल्य विकास व रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावरही भर देण्यात येणार आहे.स्थानिक आरोग्यविषयक प्राधान्यक्रम निश्चित करणे, उद्देशानुरूप उपाय तयार करणे आणि प्रत्यक्ष आरोग्य व्यवस्थेत नव्या पद्धतींची चाचणी घेणे, हा याचा उद्देश आहे. खासगी आरोग्य क्षेत्राची व्याप्ती व क्षमता सार्वजनिक आरोग्याच्या प्राधान्यक्रमांशी जोडणे, ही या उपक्रमातील महत्त्वाची संधी आहे. उपक्रमाच्या पुढील टप्प्यांत समुदायाच्या आरोग्यविषयक गरजांशी निगडित स्थानिक कौशल्यविकास, रोजगार आणि उद्योगनिर्मितीच्या संधींचाही शोध घेतला जाणार आहे. दुर्गम व आरोग्यसेवेपासून वंचित घटकांसह प्रत्येक नागरिकापर्यंत नवोन्मेष पोहोचविण्यावर या संकल्पनेत भर आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शासन, समुदाय, नवोन्मेषक आणि भागीदारांच्या सहभागातून परिणामकारक उपायांची चाचणी, त्यातून मिळणाऱ्या अनुभवांचे वेगाने विश्लेषण आणि आरोग्यसेवेची गुणवत्ता व समानता सुधारणाऱ्या उपायांचा व्यापक विस्तार करण्याचे उद्दिष्ट आहे. ‘द फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया’चा ‘मान्यता’ हा प्रमुख उपक्रम या दृष्टिकोनाचे प्रारंभिक उदाहरण आहे. मातृ आरोग्यसेवा बळकट करण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना पूरक असलेल्या या उपक्रमातून खासगी क्षेत्रातील गुणवत्ता सुधारणा प्रारूप सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसोबत कशा प्रकारे कार्य करू शकते, हे दिसून येते. ‘एमएसडी फॉर मदर्स’ या उपक्रमाचा समन्वय करत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg