loader
Breaking News
Breaking News
Foto

धाकटी जांभारीत वीज खांब कोसळून मोठी दुर्घटना; सुदैवाने जीवितहानी टळली

चिपळूण (ओंकार रेळेकर): मौजे वेळंब (नालेवाडी), ता. गुहागर येथे शृंगार तळी ते अबलोली रस्त्याच्या बाजूला बिबट्याचे पिल्लू आढळल्याची माहिती मिळताच वनविभागाने तत्परतेने घटनास्थळी धाव घेत पिल्लाचे सुरक्षित बचावकार्य केले. आज, सोमवार दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी बाळकृष्ण ओक यांनी बिबट्याचे पिल्लू आढळल्याची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पिल्लाला सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले. बचावानंतर पशुधन विकास अधिकारी जानवळे यांच्याकडून पिल्लाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीत पिल्लाची प्रकृती सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर बिबट्याचे पिल्लू अंदाजे चार ते पाच महिन्यांचे असून ते मादी आहे. हे बचावकार्य विभागीय वनाधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी चिपळूण एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या मोहिमेत वनपाल अमित निमकर (गुहागर), वनरक्षक गायकवाड (रानवी), मांडवकर (अडूर) आणि पवार (आबलोली) यांनी सहभाग घेत बिबट्याच्या पिल्लाची सुरक्षित सुटका केली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे बिबट्याच्या पिल्लाला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात यश आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg