खेड (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या खेड एसटी बसस्थानक व परिसरात अस्वच्छता, पायाभूत सुविधांची दुरवस्था आणि महिला-मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची मागणी युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन प्रांताधिकारी खेड यांच्यामार्फत देण्यात आले आहे. खेड बसस्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. यामध्ये विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार, नोकरदार, व्यापारी आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा समावेश आहे. मात्र बसस्थानकाची सध्याची अवस्था अत्यंत वाईट असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींना तोंड द्यावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
बसस्थानक परिसरात नियमित साफसफाई होत नाही. कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचारी नियुक्त करून दररोज सफाई करण्याची मागणी. आवारात मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात पाणी साचते. संपूर्ण परिसराचे दर्जेदार डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करावे. वॉटर कुलर बंद अवस्थेत आहेत. ते तातडीने दुरुस्त करून स्वच्छ पिण्याचे पाणी द्यावे. महिला, ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास होतो. स्वच्छतागृहे दुरुस्त करून पाणीपुरवठा व महिलांसाठी स्वतंत्र सुरक्षित व्यवस्था करावी. अनेक विद्युत दिवे बंद आहेत. रात्री प्रवाशांना अडचण होते. सर्व दिवे सुरू करून पुरेशी प्रकाशव्यवस्था करावी. कॅन्टीनमध्ये स्वच्छता, दर्जा आणि दरपत्रकाची तपासणी व्हावी. दुकाने नियोजनबद्ध एका बाजूला उभारून प्रवाशांचा मार्ग मोकळा ठेवावा. पुरेशी आसनव्यवस्था नसल्याने महिला, ज्येष्ठ आणि दिव्यांग प्रवाशांना त्रास होतो. आधुनिक आसनव्यवस्था करावी. बसस्थानक परिसरात मुलींची छेडछाड झाल्याच्या दोन ते तीन घटना घडल्याचे निदर्शनास आले असून यामुळे महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या संदर्भातील विशेष मागण्या : खेड बसस्थानकात किमान एक पोलीस कर्मचारी व एक होमगार्ड यांची नियमित ड्युटी लावावी. पोलीसांसाठी स्वतंत्र सुसज्ज पोलीस कक्ष उभारावा. संपूर्ण बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते २४ तास कार्यरत ठेवावेत. नियमित गस्त, गर्दीच्या व रात्रीच्या वेळी अतिरिक्त बंदोबस्त ठेवावा. महिला प्रवाशांसाठी तक्रार नोंदविण्यासाठी स्वतंत्र संपर्क व्यवस्था करावी. एसटी बसस्थानक हे सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. खेड सारख्या महत्त्वाच्या शहरातील बसस्थानकाची अशी अवस्था असणे चिंताजनक आहे. १५ दिवसांत पाहणी अहवाल आणि ३० दिवसांत कृती आराखडा द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू, असा इशारा संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर यांनी दिला आहे. हे निवेदन परिवहन मंत्री, प्रधान सचिव परिवहन, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मुंबई, विभाग नियंत्रक रत्नागिरी, पोलीस अधीक्षक रत्नागिरी, पोलीस निरीक्षक खेड आणि आगार व्यवस्थापक खेड यांना माहितीसाठी देण्यात आले आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.