loader
Breaking News
Breaking News
Foto

एटीएम कार्ड चोरून लाखोंची फसवणूक करणाऱ्या व आठ वर्षे फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

मालवण (प्रतिनिधी) - एटीएम कार्ड चोरून त्याद्वारे तब्बल ३ लाख ४३ हजार ७०० रुपये काढून आठ वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अखेर जेरबंद केले आहे. मनिष अंकुश परब (रा. वराळे, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीच्या पार्श्वभूमीची माहिती घेत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा माग काढत ही महत्त्वपूर्ण कारवाई केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या कामगिरीमुळे आठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गुन्ह्याच्या तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण पोलीस ठाण्यात १८ सप्टेंबर २०१८ रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक १०४/२०१८ अन्वये भारतीय दंड विधान कलम ३७९ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपी मनिष परब याने फिर्यादी महिलेचे एटीएम कार्ड चोरून त्याद्वारे तब्बल ३ लाख ४३ हजार ७०० रुपये काढल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू होता; मात्र अनेक प्रयत्न करूनही तो सापडत नव्हता. तब्बल आठ वर्षे तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. दीर्घकाळ फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्याच्या मोहिमेअंतर्गत मनिष परब याला शोधून अटक करण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या पथकाने आरोपीच्या पार्श्वभूमीची माहिती संकलित केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा शोध घेत पथकाने पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील वराळे येथे त्याला ताब्यात घेतले.

टाईम्स स्पेशल

ताब्यात घेतलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी मालवण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. आठ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले. ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण देसाई, आशिष जामदार आणि अविनाश ओटवणेकर सहभागी होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg