loader
Breaking News
Breaking News
Foto

ओम गणेश सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे उपसरपंच चंद्रकांत मयेकर यांचा सत्कार

साटेली-भेडशी (प्रतिनिधी) : साटेली-भेडशी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल चंद्रकांत जयराम मयेकर यांचा ओम गणेश सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश धर्णे यांच्या हस्ते मयेकर यांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. साटेली - भेडशी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन उपसरपंचाविरोधात अविश्वास ठराव संमत झाल्याने उपसरपंचपद रिक्त झाले होते. या पदासाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी उपसरपंचपदासाठी चंद्रकांत मयेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चंद्रकांत मयेकर हे गेल्या वीस वर्षांपासून ओम गणेश सार्वजनिक उत्सव मंडळाच्या कार्यात सक्रियपणे योगदान देत आहेत. मंडळाच्या विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी त्यांनी केलेल्या निस्वार्थ कार्याची दखल घेत तसेच त्यांची उपसरपंचपदी झालेली निवड या निमित्ताने मंडळाच्या गणपती सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष पंकज गाड, सचिव बाबा मयेकर, खजिनदार दशरथ मयेकर, सदस्य दत्ताराम धर्णे, वैभव इनामदार, संतोष गवस, सूर्यकांत भट, संजय धर्णे आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg