मालवण (प्रतिनिधी) - मालवण शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून कुत्र्यांमुळे नागरिकांना अनेक त्रासाना सामोरे जावे लागत आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी करून देखील मालवण नगरपालिकेने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसात कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास शहरातील कुत्रे पकडून नगरपालिकेच्या गेट समोर बांधू, असा इशारा मनसेचे मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी दिला आहे.
मालवण शहरात कुत्र्यांची संख्या वाढत आहे. शहरात माणसांपेक्षा कुत्रे जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक प्रभागात, प्रत्येक रस्त्यावर, गल्ली बोळात कुत्र्यांचा वावर असल्याने नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागत आहेत. लहान मुले, महिला, वृद्ध यांना कुत्र्यांच्या भीतीपोटी रस्त्यावरून चालणे मुश्किल बनले आहेत. कुत्र्यांनी हल्ला करून चावा घेतल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली जगत आहेत. याबाबत नगरपालिकेचे वारंवार लक्ष वेधून देखील कोणतीही कारवाई झालेली नाही, कुत्रे नसबंदीसाठी निधी आला असेल तर तो गेला कुठे? असा सवाल गॅरी अन्ननसिएशन यांनी उपस्थित केला आहे.
नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांनी गणेशोत्सवानंतर कुत्रे पकड मोहीम राबवून त्यांची नसबंदी करण्याचे आश्वासन दिले होते. येत्या आठ दिवसात यां आश्वासनाप्रमाणे कार्यवाही न झाल्यास आम्ही स्वतः कुत्रे पकडून आणून नगरपालिकेच्या गेटवर बांधू, असा इशारा गॅरी अन्ननसिएशन यांनी दिला आहे. कुत्रे पकडून दाखवून देऊ की आम्ही कुत्रे पकडू शकतो तर नगरपालिका प्रशासन का पकडू शकत नाही, असेही गॅरी अन्नसिएशन यांनी म्हटले असून कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी नगरपालिकेने तात्काळ कार्यवाही करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.









































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)


















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.