loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरुखात २ ऑक्टोबरला ‘निवडणूक आयुक्त हटाओ’ आंदोलन, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांचे नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देवरुखात ‘निवडणूक आयुक्त हटाओ’ आंदोलन करण्यात येणार आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त शुक्रवार, २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता हे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी केले आहे. देवरुख येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ, तहसीलदार कार्यालयासमोर हे निदर्शनाचे आंदोलन होणार असल्याचे आयोजकांच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आंदोलनाच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवावे, त्यांच्याविरोधात करण्यात येणार्‍या आरोपांची व कथित गैरप्रकारांची चौकशी करावी, तसेच संबंधित निवडणुका रद्द करून बॅलेट पेपरद्वारे फेरनिवडणुका घ्याव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय केंद्र सरकारला बरखास्त करण्याची मागणीही प्रसिद्धीपत्रकातून करण्यात आली आहे.निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा आधार असल्याने तिच्याबाबत नागरिकांमध्ये विश्वास आणि पारदर्शकता कायम राहणे आवश्यक असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

टाईम्स स्पेशल

याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात येत असून, ‘निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी नागरिकांनी आवाज उठवावा आणि आंदोलनात सहभागी व्हावे’, असे आवाहन युयुत्सु आर्ते यांनी केले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या अधिकृत माहितीनुसार ज्ञानेश कुमार यांनी १९ फेब्रुवारी २०२५ रोजी भारताचे २६ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे. आता देवरुखात गांधी जयंतीच्या दिवशी होणार्‍या या आंदोलनाकडे नागरिकांचे तसेच प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg