खेड (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पूरग्रस्त व्यापार्यांची अद्याप प्रलंबित असलेली नुकसानभरपाई आणि महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचार्यांच्या सेवासुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर यांनी या दोन्ही गंभीर विषयांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वतंत्र निवेदनांद्वारे ठोस मागण्या केल्या आहेत. केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष निर्णय आणि अंमलबजावणी हवी, अशी भूमिका या निवेदनांतून मांडण्यात आली आहे. खेड शहरात आलेल्या पुरामुळे अनेक व्यापार्यांच्या दुकानांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. दुकानांमधील साहित्य, माल, फर्निचर, यंत्रसामग्री तसेच व्यवसायासाठी आवश्यक वस्तूंचे नुकसान झाले. या आपत्तीमुळे अनेक व्यापारी आर्थिक संकटात सापडले असून काहींचे व्यवसाय अद्याप पूर्वपदावर आलेले नाहीत. पूरपरिस्थितीनंतर शासनाकडून नुकसानग्रस्तांना मदत आणि नुकसानभरपाई देण्याबाबत कार्यवाही करण्यात आली होती. मात्र खेड शहरातील अनेक पात्र व्यापार्यांना अद्याप नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली नसल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. यामुळे संबंधित व्यापार्यांवर कर्जाचे हप्ते, दुकानभाडे, वीजबिल, कामगारांचे वेतन आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आर्थिक भार पडत आहे.
बाळा खेडेकर यांनी शासनाकडे केलेल्या प्रमुख मागण्या : खेड शहरातील पूरग्रस्त व्यापार्यांचे नव्याने सर्वेक्षण करून नुकसानभरपाईपासून वंचित राहिलेल्या पात्र व्यापार्यांची स्वतंत्र यादी तयार करावी. पंचनामे झालेले असूनही नुकसानभरपाई न मिळालेल्या व्यापार्यांची प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. शासनाच्या नियमानुसार मंजूर झालेली नुकसानभरपाई पात्र व्यापार्यांच्या खात्यात तातडीने वितरित करावी. पंचनामे न झालेल्या किंवा कागदपत्रांतील त्रुटींमुळे मदत न मिळालेल्या व्यापार्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची संधी देऊन फेरतपासणी करावी. नुकसानभरपाईसाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्यास शासनाने तातडीने निधी मंजूर करून वितरणाची व्यवस्था करावी. खेड शहरातील नुकसानभरपाईची एकूण प्रलंबित प्रकरणे, मदत मिळालेले व्यापारी आणि अद्याप मदतीपासून वंचित असलेल्या व्यापार्यांची अधिकृत माहिती सार्वजनिक करावी. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन कालमर्यादेत कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत. या निवेदनाची प्रत मदत व पुनर्वसन मंत्री, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, जिल्हाधिकारी रत्नागिरी, उपविभागीय अधिकारी खेड, तहसीलदार खेड आणि खेड नगरपरिषद यांनाही देण्यात आली आहे.
दुसर्या निवेदनातून महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचार्यांच्या दीर्घकालीन सेवासुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. राज्यातील शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, विविध शासकीय कार्यालये तसेच खासगी आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणावर कंत्राटी पद्धतीने कर्मचारी काम करीत आहेत. अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच प्रकारचे नियमित आणि कायमस्वरूपी स्वरूपाचे काम करतात. मात्र कंत्राटी पद्धतीमुळे त्यांना नोकरीची सुरक्षितता, योग्य वेतन, सामाजिक सुरक्षा आणि भविष्याची हमी मिळत नसल्याची बाब संघटनेने निदर्शनास आणली आहे. कंत्राटदार बदलल्यामुळे कर्मचार्यांच्या रोजगारावर परिणाम होतो. काही ठिकाणी समान स्वरूपाचे काम करूनही नियमित कर्मचार्यांच्या तुलनेत कंत्राटी कर्मचार्यांना कमी वेतन आणि अपुर्या सुविधा मिळत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संघटनेच्या निवेदनातील भूमिकेनुसार, या मागण्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधासाठी किंवा समर्थनासाठी नसून महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि पूरग्रस्त व्यापाऱ्यांना आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी आहेत.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.