loader
Breaking News
Breaking News
Foto

पावसात, जंगलात बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांना आता ‘टेंट’चा आधार; एसपी नितीन बगाटे यांचा पुढाकार

रत्नागिरी (जमीर खलफे) - सण-उत्सव, विविध कार्यक्रम आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांना रात्री-अपरात्री दुर्गम, जंगलमय तसेच पावसाचा मारा झेलणाऱ्या भागांत बंदोबस्तासाठी तैनात राहावे लागते. अशा वेळी विश्रांतीसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या पुढाकारातून बंदोबस्तावरील पोलिसांसाठी टेंट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या उपस्थितीत पोलिस मुख्यालय येथे टेंट उभारण्यात आला. यावेळी बगाटे यांनी टेंटच्या आतील व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी माहिती देताना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळी वातावरण आणि जंगलमय भौगोलिक परिस्थितीमुळे विविध ठिकाणी पोलिसांना बंदोबस्तासाठी तैनात राहावे लागते. अनेकदा पावसात आणि प्रतिकूल परिस्थितीतही पोलिसांना आपले कर्तव्य बजावावे लागते. अशा वेळी त्यांना निवाऱ्याची सुविधा मिळावी, या दृष्टीने पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करून रत्नागिरी पोलीस दलाला टेंट उपलब्ध करून दिले आहेत.

टाईम्स स्पेशल

या सुविधेमुळे बंदोबस्ताच्या ठिकाणी पोलिसांना निवाऱ्याचा आधार मिळेल. विशेषतः जंगलमय आणि दुर्गम भागांत बंदोबस्त करताना या टेंटचा उपयोग होणार आहे. प्रतिकूल हवामानातही पोलिसांना अधिक सोयीस्कर पद्धतीने कर्तव्य बजावता यावे, हा या सुविधेमागील मुख्य उद्देश आहे. पोलीस दलासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल पोलीस महासंचालक सदानंद दाते यांचे नितीन बगाटे यांनी विशेष आभार मानले आहे. अल निनोच्या प्रभावामुळे तापमानवाढ आणि पावसाच्या अनिश्चिततेबाबत चिंता व्यक्त केली जात असताना, बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो. रत्नागिरीसारख्या भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण जिल्ह्यात पावसाळी वातावरण, जंगलमय परिसर आणि दुर्गम ठिकाणी पोलिसांना अनेकदा प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावावे लागते. अशा वेळी निवारा आणि विश्रांतीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केलेला पुढाकार महत्त्वाचा आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg