loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी विमानतळावरुन प्रवासाचे स्वप्न सत्यात उतरण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल...

रत्नागिरी : रत्नागिरी विमानतळाच्या विकासाला आता प्रत्यक्ष आणि वेगवान गती मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील विमानतळ विकासासाठी मोठा निर्णय घेत थेट १०.६७ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला अधिकृतपणे वितरित केला आहे. त्यामुळे रत्नागिरीतील विमान प्रवासाचे स्वप्न सत्यात उतरण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. २०२६-२७ या चालू आर्थिक वर्षासाठी शासनाने विमानतळ विकासांतर्गत एकूण १३०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. या तरतुदीमधून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने रत्नागिरीसह शिर्डी, नांदेड, लातूर आणि आर.सी.एस. (प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना) अंतर्गत येणार्‍या विमानतळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडे अधिकृत मागणी केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पाठपुराव्याला यश आले असून, शासनाने एकूण ८५.१२ कोटी रुपयांचा निधी थेट कंपनीला वर्ग केला आहे. यातील रत्नागिरीच्या वाटेला आलेले १०.६७ कोटी रुपये हे या भागातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. दरम्यान, हा निधी कागदोपत्री किंवा कागदावर राहू नये यासाठी शासनाने अत्यंत कडकडीत आणि काटेकोर नियम व अटी लागू केल्या आहेत. वितरित करण्यात आलेला हा संपूर्ण निधी पूर्णपणे सशर्त असून, ज्या विशिष्ट विकासकामांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आला आहे, त्याच कामांवर तो खर्च करणे कंपनीला बंधनकारक राहील. विशेष म्हणजे, हा सर्व निधी आगामी ३१ मार्च २०२७ पूर्वी कोणत्याही परिस्थितीत खर्च पाडावा, याची पूर्ण खबरदारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने घेण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

या सर्व प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी बिम्स प्रणालीचा वापर केला जाणार असून, यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या सहसचिव किंवा उपसचिवांना नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच संचालनालय स्तरावर देयके अदा करण्यासाठी विमानचालन संचालनालयाचे उपसंचालक हे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. या आर्थिक सहाय्यामुळे आता रत्नागिरी विमानतळाच्या विकासातील तांत्रिक आणि आर्थिक अडथळे दूर झाले असून, कोकणातील हवाई कनेक्टिव्हिटीचा मार्ग खर्‍या अर्थाने सुकर झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg