loader
Breaking News
Breaking News
Foto

गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात पॉश कायद्यावर मार्गदर्शन

रत्नागिरी (जमीर खलफे) : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) वरिष्ठ महाविद्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समितीतर्फे राधाबाई शेटये सभागृहात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जागृतीपर व्याख्यान झाले. व्याख्यानात महिलांची सुरक्षितता, कार्यस्थळावरील लैंगिक छळ प्रतिबंध व निवारण तसेच संबंधित कायदे व अधिकार हे प्रमुख मुद्दे होते. 'सखी वन स्टॉप सेंटर'च्या केंद्र प्रशासक अश्विनी मोरे प्रमुख वक्त्या होत्या. तसेच व्यासपीठावर प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई आणि कायदेशीर सल्लागार ॲड. अश्विनी उपळेकर व्यासपीठावर उपस्थित होत्या. प्रा. हर्षदा पटवर्धन यांनी प्रास्ताविक करून व क्त्यांचा परिचय करून दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मोरे यांनी व्याख्यानात भंवरीदेवी प्रकरण आणि विशाखा विरुद्ध राजस्थान राज्य खटल्याच्या संदर्भाने पॉश कायद्याची पार्श्वभूमी सांगितली. हा कायदा खासगी आस्थापनांप्रमाणेच शासकीय ठिकाणीही लागू होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. छळाचे विविध प्रकार सांगून प्रत्येक महिलेला सुरक्षित वातावरणात काम करण्याचा अधिकार आहे, यावर त्यांनी भर दिला. तक्रार दाखल करण्याची कारणे आणि पद्धत त्यांनी समजावून सांगितली. तक्रार खोटी असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईचा अधिकार समितीला आहे, असेही त्यांनी सांगितले. कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे जलदगतीने निवारण करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले असल्याचे सांगितले.

टाईम्स स्पेशल

प्रश्नोत्तर सत्रात शिक्षकांच्या शंकांचे निरसन झाले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. साखळकर यांनी महाविद्यालयातील अंतर्गत तक्रार समितीची रचना व कार्यपद्धती सांगितली. समितीच्या प्रमुख डॉ. निधी पटवर्धन यांनी आभार मानले व महिला सुरक्षेची शपथ देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg