loader
Breaking News
Breaking News
Foto

तटकरे गरजले; सामंतांनी सूत्रे हलवली, जिल्हा नियोजनातील वादावर पालकमंत्र्यांचा ‘फायनल टच’; खेडच्या अडीच कोटींच्या कामांना बैठकीच्या दिवशीच वर्क ऑर्डर

रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकासकामांच्या निधीवरून खासदार सुनील तटकरे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले. त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांना वर्क ऑर्डर देण्यात अडथळे आणले जात असल्याचा मुद्दा त्यांनी थेट बैठकीत उपस्थित केला. वातावरण तापले असतानाच पालकमंत्री उदय सामंत यांनी हस्तक्षेप करत आठ दिवसांत निर्णय घेऊ, अशी भूमिका घेतली. मात्र, आठ दिवसांची मुदत संपण्याची वाट न पाहताच सोमवारी बैठक झालेल्याच दिवशी खेड तालुक्यातील सुमारे अडीच कोटी रुपयांच्या कामांना वर्क ऑर्डर देण्यात आल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेड तालुक्यात जिल्हा परिषद अंतर्गत जनसुविधा, पाणीपुरवठा आणि बांधकाम विभागातील ही कामे आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या कामांना तरतूद करण्यात आली होती. मात्र, मंजुरीनंतरही प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश मिळत नसल्याचा मुद्दा खासदार तटकरे यांनी बैठकीत उपस्थित केला. तटकरे यांनी हा प्रश्न आक्रमकपणे मांडत मंजूर विकासकामे नेमकी का अडवली जात आहेत? असा सवाल उपस्थित केला. विकासासाठी उपलब्ध निधी असूनही कामे सुरू होत नसतील तर त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्नही बैठकीत चर्चेत आला.

टाईम्स स्पेशल

या मुद्द्यावरून बैठकीत वातावरण काही काळ चांगलेच तापले. महायुतीतील दोन प्रमुख नेत्यांमध्ये विकासकामांच्या मंजुरीवरून निर्माण झालेला हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला. मात्र, परिस्थिती अधिक चिघळू न देता पालकमंत्री उदय सामंत यांनी हस्तक्षेपाची भूमिका घेतली. संबंधित कामांबाबत आठ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg