loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र राज्याच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये रत्नागिरी नगरपरिषदेने रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला

रत्नागिरी - महाराष्ट्र राज्याच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये रत्नागिरी नगरपरिषदेने चौथा क्रमांक प्राप्त करून रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. हा गौरव म्हणजे रत्नागिरीच्या विकासासाठी सुरू असलेल्या सामूहिक प्रयत्नांचे आणि समर्पित कार्याचे फलित आहे. या यशामागे आमदार तथा पालकमंत्री उदय सामंत यांचे खंबीर नेतृत्व, दूरदृष्टी आणि मोलाचे मार्गदर्शन, तसेच धडाडीचे आमदार किरण सामंत यांची समर्थ साथ आणि शिल्पाताई सुर्वे यांचे सहकार्य व समन्वय यांचा मोलाचा वाटा आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उल्लेखनीय यशाबद्दल रत्नागिरी नगरपरिषदेचा हा सन्मान नवी दिल्ली येथे भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. या यशासाठी योगदान देणारे नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि रत्नागिरीकर नागरिक या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg