खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील बोरघर येथे गुरुवारी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास अर्टिगा कारने महामार्गावर काम करणाऱ्या जेसीबीला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात कारमधील सौरभ भागोजी टोणे (वय २२, रा. कवठे महांकाळ, जि. सांगली) हे जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर बोरघर येथे दुभाजकाच्या मध्यभागी झाडे लावण्यासाठी खड्डे काढण्याचे काम सुरू होते. या कामासाठी जेसीबी मशीन महामार्गावर कार्यरत होते. याचदरम्यान मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या MH 03 FD 2452 क्रमांकाच्या अर्टिगा कारने जेसीबीला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले असून कारमधील सौरभ टोणे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच त्यांना तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. सौरभ टोणे हे मूळचे कवठे महांकाळ, जिल्हा सांगली येथील असून ते महामार्गावरून पाटणच्या दिशेने जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, अपघाताच्या वेळी महामार्गावर खड्डे काढण्याचे काम सुरू असताना वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. कामाच्या ठिकाणी वाहतूक वळविण्यासाठी आवश्यक बॅरिकेड्स, दिशादर्शक फलक किंवा इतर सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याबाबतही स्पष्टता झालेली नाही.
महामार्गावर वाहतूक सुरू असतानाच काम सुरू असल्याने अशा ठिकाणी वाहनचालकांना कामाची पूर्वसूचना मिळणे आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे या अपघाताच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणेकडून महामार्गावरील कामाच्या ठिकाणी करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली जाणे अपेक्षित आहे. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली. मात्र, महामार्गावरील सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत नाही ना, हा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. अपघाताचे नेमके कारण तसेच कामाच्या ठिकाणी करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत अधिकृत माहिती संबंधित यंत्रणांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)

















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.